आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 70 व्या वर्षी पुतीन पुन्हा होणार 'बाबा':'गर्लफ्रेंड' अलिना काबेवा प्रेग्नंट, युद्धादरम्यानच्या या 'गुड न्यूज'मुळे रशियन राष्ट्राध्यक्ष नाराज

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन वयाच्या 70 व्या वर्षी पुन्हा एकदा वडील होणार आहेत. पुतिन यांची 38 वर्षीय सीक्रेट गर्लफ्रेंड अलिना काबेवा पुन्हा एकदा गरोदर आहे. पुतीन या वर्षी ऑक्टोबरमध्ये 70 वर्षांचे झाले आहेत आणि त्यांना आधीच माजी ऑलिम्पिक जिम्नॅस्ट अलिनापासून दोन मुले आहेत. पुतीन यांना आणखी मुले नको होती आणि त्यामुळेच ही बातमी आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे.

वडील होणार असल्याच्या बातमीने पुतीन यांना धक्का
रशियन न्यूज चॅनल जनरल एसव्हीआर टेलिग्रामनुसार, अलिना पुन्हा गर्भवती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतीन हे लाल स्क्वेअरवर रशियाच्या विजय दिनाच्या परेडची तयारी करत होते, तेव्हा त्यांना अलिनाच्‍या गरोदरपणाची माहिती मिळाली. पुतीन यांनी त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. रशियन वाहिनीने म्हटले "पुतिन यांना कळले आहे की त्यांची मैत्रीण पुन्हा गर्भवती आहे आणि असे दिसते की ते योजनेनुसार नाही." व्लादिमीर पुतीन आणि अलिना काबेवा यांना आधीच दोन मुले आहेत. अलिनाने 2015 मध्ये पहिल्या मुलाला तर 2019 मध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला होता.

अलिनाबरोबर जवळीकीची चर्चा
पुतीन आणि मुलांसोबत अलिनाच्या जवळीकीच्या बातम्या अनेकदा मीडियात येतात. अलिना एक रशियन राजकारणी, मीडिया मॅनेजर आणि निवृत्त रिदमिक जिम्नॅस्ट आहे. अलिना ही आतापर्यंतची सर्वात यशस्वी जिम्नॅस्टिक मानली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत 2 ऑलिम्पिक पदके, 14 जागतिक चॅम्पियनशिप आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.

डिसेंबर 2021 मध्ये शेवटची दिसली होती
अलिना सार्वजनिक ठिकाणी क्वचितच दिसते. डिसेंबर 2021 मध्ये मॉस्को येथे झालेल्या डिव्हाईन ग्रेस रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत ती शेवटची नृत्य करताना दिसली होती. 2004 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने रिदमिक जिम्नॅस्टमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. द गार्डियन सारख्या अनेक वृत्तपत्रांनी अलिना पुतीन यांची मैत्रीण असल्याचा दावा केला आहे. मात्र, पुतिन यांनी हे कधीच जाहीरपणे मान्य केलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...