आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Girls From All Over The World Suffer From Mental Stress, Anxiety During The Corona Period | Marathi News

दिव्य मराठी विशेष:कोरोनाकाळात जगभरातील मुली मानसिक तणाव, चिंतेसह ईटिंग, टिकटॉक डिसऑर्डरच्याही शिकार

न्यूयॉर्क / मॅट रिचटेल6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१० ते १९ वयोगटातील मुलींच्या मानसिक आरोग्यावर कोरोना महामारीचा खूप मोठा परिणाम पडला आहे. त्यांच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याचीही हानी झाली आहे. किशोरवयीन मुलींच्या सवयीत बदल झाला आहे. त्या घबराट, तणाव आणि चिंतेने ग्रस्त आहेत. एवढेच नव्हे तर मुलींमध्ये टिकटॉक डिसऑर्डरही वाढला आहे, असा दावा रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) केलेल्या एका अध्ययनातील निष्कर्षातून करण्यात आला.

बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ व हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रशिक्षक एमिली प्लुहर याबाबत म्हणाल्या, महामारीच्या काळात तरुणांनी एकटेपणा, राग अनावर न होणे इत्यादी भावना जास्त प्रमाणात अनुभवल्या. काहींनी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलींच्या खाण्याच्या सवयीत मोठा बदल झाला. मुलींचे आहारावर नियंत्रण राहिलेले नाही. किशोरवयीनांमधील इटिंग डिसऑर्डर दुप्पट झाला आहे.

काहींची दिनचर्या बिघडली आहे. मानसिक तणाव व भोजन उपलब्धता यातूनदेखील ते नव्या सवयींच्या आहारी गेले आहेत, असा दावा अभ्यासकांनी केला आहे. त्यांच्या टिकटॉक डिसऑर्डर म्हणजेच टिकटाॅकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासन््तास राहण्याची सवय वेगाने वाढली. सामान्यपणे अशा प्रकारचा विकार मुलांमध्ये पाहायला मिळतो. काही मुली अशा प्लॅटफॉर्मच्या व्यसनापायी स्वत:ला त्यासाठी विकसित करू लागल्या आहेत. किशोरवयीन मुलींमध्ये महामारीच्या काळात टिकटॉक व्यवहार अधिकच वाढल्याने त्यांच्या मानसिक अनारोग्यातही वाढ झाली आहे.

गेल्या ११ वर्षांमध्ये मानसिक विकारांत २८ टक्क्यांची वाढ
२०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये स्थलांतरितांच्या संख्येत ५१ टक्के व २०२१ मध्ये २२ टक्के घट दिसून आली. त्यातच मुलांच्या संगोपनाकडेही दुर्लक्ष करण्यात आले. जलतरण, धावणे इत्यादीमुळे होणाऱ्या जखमांचे प्रमाण आता कमी झाले आहे. या महामारीत किशोरवयीन मुलींमध्ये मानसिक त्रास वाढले. वास्तविक मानसिक आरोग्यासंबंधी विकारांत २००७ ते २०१८ पर्यंत २८ टक्के वाढ झाली. २०१९ च्या तुलनेत २०२० व २०२१ मध्ये मुलींच्या मानसिक आरोग्यात अधिकच घसरण झाली.

बातम्या आणखी आहेत...