आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा मिळेल?:भारताला काटसातून सवलत द्या; अमेरिकन संसदेमध्ये प्रस्ताव

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काउंटरिंग अमेरिकाज अॅडव्हर्सरीज थ्रू सँक्शन्स अॅक्ट (काटसा) निर्बंधांतून सवलत मिळावी यासाठी अमेरिकेतील प्रतिनिधी सभागृहात एक विधेयक मांडण्यात आले. भारतवंशीय खासदार रो खन्ना यांनी हे विधेयक सादर केले. चीन व रशिया यांच्यातील वाढते संबंध व रशियाच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारताला काटसामधून सवलत देणे अमेरिकेच्या हिताचे आहे.

या विधेयकाचे खासदार ब्रॅड शेरमन व डेव्हिड श्वीकर्ट यांनीही पाठिंबा दर्शवला आहे. सवलत दिल्यास भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण भागीदारी आणखी वाढेल. खन्ना यांनी याआधी राष्ट्रीय संरक्षणविषयक कायद्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मांडला होता. तेव्हा त्याला डेमोक्रॅटिकसोबतच रिपब्लिकनच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला होता.

बातम्या आणखी आहेत...