आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानृत्यामुळे आरोग्याला फायदा होतो हे सर्वांना माहीत आहे, पण पर्यावरण संरक्षणातही ते महत्त्वाचे योगदान देऊ शकते हे फार कमी लोकांना माहीत असेल. नृत्याची ही खुबी ओळखली आहे ग्लासगोच्या आर्ट सेंटर एसडब्ल्यूजी-३ ने. हे आर्ट सेंटर अशी कूलिंग आणि थर्मल यंत्रणा आणत आहे, जी नर्तकांच्या शरीरातून निघणाऱ्या ऊर्जेने संचालित होईल. जगातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे विजेचा वापर कमी होईल व कार्बन उत्सर्जनही घटेल.
एसडब्ल्यू जिओथर्मल एनर्जी कन्सल्टन्सी टाऊनरॉकसोबत हा प्रकल्प सुरू करत आहे. त्याचे उद्दिष्ट कार्बन उत्सर्जन ६० ते ७०% घटवणे हे आहे. या दोघांनी स्थापन केलेली कंपनी इतर उपक्रमांतही अशाच प्रकारचे तंत्रज्ञान लागू करण्यास मदत करेल. आर्ट सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक अँड्ऱ्यू फ्लेमिंग ब्राऊन यांनी सांगितले,‘कोरोनाकाळात पर्यावरणाचे महत्त्व कळाले. ही भीती कमी होईल तसे नृत्याशी संबंधित कार्यक्रम होतील. त्यामुळे वीज व इतर वस्तूंचा खपही वाढेल. त्या अर्थाने हा अनुकरणीय उपक्रम आहे. ग्लासगोने या वर्षी पर्यावरण परिषदेचे यजमानपद भूषवले आहे, त्यामुळे या दिशेने ठोस काम सुरू करावे ही जबाबदारी ठरते. एसडब्ल्यूजी-३ मध्ये वार्षिक २.५ लाखांपेक्षा जास्त लोक नृत्य, संबंधित कार्यक्रमांत सहभागी होतात. त्यातून किती ऊर्जा मिळवू शकतो याचा विचार करा. काहीही खर्च न करता ऊर्जा मिळत असेल तर तिचा वापर का करू नये, असा विचार आम्ही केला.’
अशी काम करेल यंत्रणा : शरीरातील उष्णता साठवण्यासाठी हीट पंप अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहेत. ते अगदी फ्रिजसारखे काम करते, गरम हवा बाहेर नेऊन आतील भाग थंड ठेवते. नर्तकांकडून मिळालेली उष्णता ५०० फूट खोल बोअरमध्ये घेऊन जाईल. त्यामुळे तेथील खडक थर्मल बॅटरीसारखे काम करेल. तेथे ऊर्जा साठवली जाईल. तिचा नंतर गरम पाण्याच्या पुरवठ्यासाठी वापर होईल.
विश्रांतीच्या वेळी शरीर १०० वॅट ऊर्जा निर्माण करते, नृत्याच्या वेळी ६ पट जास्त
डान्स व स्पोर्ट्््स मेडिसिनतज्ज्ञ सेलिना शहा सांगतात,‘विश्रांतीच्या मुद्रेत शरीर १०० वॅट ऊर्जा निर्माण करते, वेगवान नृत्यात ती ५-६ पट वाढू शकते. वेगवान बीट्सवर नृत्य केल्यास आपण ऊर्जेचे पॉवरहाऊस होऊ शकतो. पर्यावरणाबाबत युवकही चिंतित आहेत, त्यांना अशा ठिकाणी इव्हेंटमध्ये जाण्यासाठी प्रेरित करू शकतो.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.