आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Glasgow COP26 Leaders Summit; PM Modi Said – Focus On Solar Projects, Need One World – One Sun And One Grid

ग्लास्गो COP26 लीडर्स समिट:सोलर प्रोजेक्ट्ससाठी वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड असणे जगासाठी आवश्यक, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य; भारतासाठी झाले रवाना

ग्लास्गोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्लासगो, स्कॉटलंड येथे आयोजित COP26 लीडर्स कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन एनर्जीवर भाषण केले. 'एक्सलेरेटिंग क्लीन टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट' या कार्यक्रमातील भाषणादरम्यान पंतप्रधान म्हणाले की, जर आपण एक सूर्य, एक जग आणि एक ग्रीडचे स्वप्न साकार करू शकलो, तर सौर प्रकल्पांना चालना मिळेल.

मोदी म्हणाले- जरा कल्पना करा, यामुळे कार्बन उत्सर्जन किती कमी होईल आणि आपण स्वच्छ आणि हरित ऊर्जेकडे वाटचाल करू शकू. त्यामुळे देशांमधील सहकार्य वाढेल. जीवाश्म इंधनाचा काही देशांना फायदा होऊ शकतो, पण त्यामुळे जगाचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्याही समस्या वाढणार आहेत.

जीवाश्म इंधनामुळे देश समृद्ध झाले, पर्यावरण निर्धन
पंतप्रधान म्हणाले- ग्रीन ग्रीडच्या माझ्या अनेक वर्षांच्या जुन्या संकल्पनेला आज इंटरनॅशनल सोलर अलायन्स आणि यूकेच्या ग्रीन ग्रिड इनिशिएटिव्हमुळे ठोस स्वरूप प्राप्त झाले आहे. औद्योगिक क्रांती जीवाश्म इंधनामुळे झाली. जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे अनेक देश समृद्ध झाले आहेत, परंतु आपली पृथ्वी, आपले पर्यावरण निर्धन झाले आहे. जीवाश्म इंधनाच्या शर्यतीने भू-राजकीय तणावही निर्माण केला, परंतु आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

निसर्गाच्या पुढे जाण्याच्या स्पर्धेमुळे पर्यावरणाचे नुकसान
मोदी पुढे म्हणाले- जेव्हापासून पृथ्वीवर जीवसृष्टीची उत्पत्ती झाली, तेव्हापासून सर्व सजीवांचे जीवनचक्र, त्यांचा दिनक्रम सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याशी संबंधित आहे. जोपर्यंत हा नैसर्गिक संबंध राहिला तोपर्यंत आपला ग्रहही निरोगी होता, परंतु आधुनिक काळात मानवाने सूर्याने स्थापन केलेल्या चक्राला मागे टाकण्याच्या शर्यतीत नैसर्गिक समतोल ढासळला आहे आणि आपल्या पर्यावरणाचेही मोठे नुकसान केले आहे.

संतुलित जीवनाचा मार्ग सूर्यप्रकाशाने प्रकाशित होईल
पंतप्रधान म्हणाले- जर आपल्याला पुन्हा निसर्गाशी संतुलित जीवनाचे नाते प्रस्थापित करायचे असेल तर त्याचा मार्ग आपल्या सूर्याद्वारे प्रकाशित होईल. या सर्जनशील उपक्रमामुळे कार्बन फूटप्रिंट आणि ऊर्जा खर्च कमी होईलच, यासोबतच विविध प्रदेश आणि देशांमधील सहकार्याचा एक नवीन मार्गही खुला होईल.

वर्ल्ड वाइड ग्रिडने प्रत्येक वेळी मिळेल क्लीन एनर्जी
पंतप्रधान पुढे म्हणाले की, मला पूर्ण विश्वास आहे की वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड आणि ग्रीन ग्रिड इनिशिएटिव्हच्या सामंजस्यामुळे एक संयुक्त आणि सुदृढ वैश्विक ग्रिडचा विकास होऊ शकेल. एकमेव आव्हान म्हणजे सौरऊर्जा फक्त दिवसा उपलब्ध असते आणि ती हवामानावर अवलंबून असते.

बातम्या आणखी आहेत...