आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान संमेलन:2030 पर्यंत वृक्षतोड बंद करणार, ग्लासगोमध्ये नेत्यांचा संकल्प!

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्राझील, चीन, अमेरिकेसह 100 हून जास्त देशांनी दर्शवली सहमती

ग्लासगाेमधील हवामान बदल संमेलनात ब्राझील, चीन व अमेरिकेसह १०० हून जास्त देशांतील नेत्यांनी २०३० पर्यंत वनांची कत्तल बंद करण्याचा संकल्प केला आहे. जगभरातील एकूण जंगलांपैकी संयुक्त रूपाने ८५ टक्के भाग या देशांत आहे. वने संरक्षणासाठी सहाकलमी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी विविधता असलेल्या सार्वजनिक व खासगी स्राेतांकडून आर्थिक व गुंतवणुकीत उल्लेखनीय वृद्धीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यास प्राधान्य दिले जाणार आहे. कार्बन डायआॅक्साइडच्या उत्सर्जनात घट करणे आणि ग्लाेबल वाॅर्मिंगमधील वाढीचा वेग कमी करून वनांचे संरक्षण करण्याची मागणीही नेत्यांनी केली आहे.प्रस्तावावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जाॅन्सन यांनी नेत्यांना एकत्रित येण्यासाठी विशिष्ट पद्धतीला स्वीकारणे गरजेचे आहे, असा आग्रह केला. आता आगामी पाच वर्षांत वनहानी कमी करणे व हे नुकसान टाळण्यासाठी सार्वजनिक निधीत १२ अब्ज डाॅलर (सुमारे ९० हजार काेटी रुपये) देण्याचे वचन दिले आहे.

खासगी कंपन्यांनी विविध पद्धतीने वनांचे संरक्षण व त्यांच्या उभारणीसाठी ७ अब्ज डाॅलर (सुमारे ३७ हजार काेटी रुपये) देण्याचे जाहीर केले. या निधीत स्थानिक लाेकांच्या १२ हजार ५०० काेटी रुपयांहून जास्त याेगदानाचा समावेश आहे. ३० हून जास्त वित्तसंस्थांच्या म्हणण्यानुसार वनक्षेत्राचा विनाश करणाऱ्या कंपन्यांचे भागीदार हाेणार नाहीत. पुरवठा करणारी साखळी बंद करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार केली जाणार आहेत. जाॅन्सन म्हणाले, आपला हा संकल्प मानवतेसाठी महत्त्वाचा ठरताे. त्याचबराेबर पर्यावरणाचे संरक्षक हाेण्याचीदेखील संधी ठरेल.

या संकल्पाची अंमलबजावणी झाल्यानंतर वने व जमिनीचा तसेच १.३ काेट्यवधी चाैरस मैलांहून जास्त वनक्षेत्राचे संरक्षण करता येणार आहे. वनांची कत्तल करून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंची आयात बंद करण्याचे २८ देशांनी ठरवले आहे.

केवळ चर्चा करून भागणार नाही, पर्यावरणवाद्यांचा इशारा
जागतिक नेत्यांच्या संकल्पावर पर्यावरण समर्थकांनी इशारा दिला आहे. केवळ चर्चा करून वनांची हानी थांबणार नाही. संयुक्त राष्ट्रात २०१७ मध्येही असाच संकल्प झाला हाेता. २०१४ मध्ये न्यूयाॅर्कमधील बैठकीतही २०३० पर्यंत वनांची कत्तल थांबवण्याचा करार झाला हाेता. त्यानंतरही वृक्षताेड थांबली नव्हती.

मिनिटाला फुटबाॅल मैदानाएवढी वने नष्ट
जागतिक बँकेनुसार चीनच्या एकूण भूभागापैकी सुमारे २३ टक्के भागावर वनांचा अभाव आहे. १९९० च्या तुलनेत १७ टक्के वाढला. वनक्षेत्र वाढवण्याचा चीनचा संकल्प म्हणजे रशियातून जास्त लाकूड आयात केली जाणार आहे. त्याचा थेट परिणाम पुन्हा जंगल क्षेत्रावर होईल, असे तज्ञांना वाटते.

बातम्या आणखी आहेत...