आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्लोबल पीस इंडेक्स-2022:आइसलँड जगातील सर्वात शांतताप्रिय देश, भारत 135 व्या स्थानी

आइसलँड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आइसलँड जगातील सर्वात शांतताप्रिय देश आहे. त्यानंतर न्यूझीलंड, आयर्लंड आहेत. ग्लोबल पीस इंडेक्स २०२२ च्या अहवालात हे स्पष्ट झाले. त्यात १६३ स्वतंत्र देश व क्षेत्रांना श्रेणी देण्यात आली. त्यात भारताने तीन अंकांनी चढाई करून १३५ वे स्थान गाठले. गेल्या वर्षी भारत १३८ व्या ठिकाणी होता.

युरोप सर्वात शांत क्षेत्र... युरोप सर्वात शांत क्षेत्र ठरले आहे. त्यात आइसलँड युरोपच्या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. डेन्मार्क, हंगेरी, फिनलंड, युरोपातील १० सर्वात शांतताप्रिय देशांत समाविष्ट आहेत.

*९० देशांच्या स्थितीत सुधारणा : गेल्या १४ वर्षांत जगभरातील शांतता कमी होत आहे. यंदा सरासरी स्कोअरमध्ये ०.३ टक्क्यांनी वाढ झाली. १६३ देशांपैकी ७१ मध्ये घसरण, ९० मध्ये सुधारणा नोंदली गेली.

बातम्या आणखी आहेत...