आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे फजिती, वाढती बेरोजगारी आणि पक्षावरजिनपिंग यांची पकड कमजोर झाल्याने सीमेवर हल्ला

हॉँगकाँग10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीनला मजबूत राष्ट्र आणि जिनपिंग यांना खंबीर, धाडसी नेता दाखवण्यासाठी मोहीम

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनावर अध्यक्ष जिनपिंग यांची पकड कोरोना महामारीपासून कमकुवत होताना दिसत आहे. एलएसीवर भारतीय सैनिकांशी झालेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एक मजबूत नेता म्हणून जिनपिंग यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न म्हणून आता या घटनेकडे पाहिले जाते. विश्लेषकांचे मत आहे की, प्रचाराअंतर्गत चीनला एक बलवान राष्ट्र म्हणून आणि जिनपिंग यांना निर्णायक नेते म्हणून उभे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, कोरोना साथीच्या आजाराशी निगडित चिनी कम्युनिस्ट पार्टी (सीसीपी) फारच अपयशी ठरल्यानंतर त्यांचा दुसरा चेहरा समोर आला आहे. अलीकडच्या काळातील चिनी आक्रमक वर्तनाचे विश्लेषण करताना चिनी कामकाज तज्ज्ञ आणि चायना नेशन्सचे सह-संस्थापक अॅडम नी म्हणाले की काही लोक दुर्दैवाने चीनला अखंड देश म्हणत ​​आहेत. पण सीसीपीमध्ये सध्या अनागोंदी माजलेली आहे. त्याचे नेते जगात वर्चस्व स्थापित करण्याचा आग्रह धरतात, पण आता चीनचे तुकडे झाले आहेत हेच वास्तव आहे. सीसीपीचे नेते परस्परविरोधी विचारांचे आहेत. ते फक्त कठीण काळात एकमेकांना जबरदस्तीने धरून असतात. 

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिकचे चिनी अर्थशास्त्र आणि व्यवसायातील तज्ञ स्कॉर्ट केनेडी म्हणाले की, महामारीमुळे देशाच्या प्रतिमेचे नुकसान झाले आहे याची भरपाई करण्यासाठी सीसीपीने सर्व नेत्यांना सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत. या कारणास्तव, चिनी नेते सध्या सोशल मीडियावर चीनच्या हिताचे रक्षण मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. ते म्हणाले की चीन ज्या विकास दराविषयी बोलतो, ते बऱ्याच बाबतीत विश्वासार्ह नाही. कोरोनामुळे चीनला ७५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले असा अंदाज केनेडी यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार २०२० मध्ये चीनचा विकास दर केवळ १.२ टक्के असेल. सीसीपीचे लक्ष्य योग्य नाही. बेरोजगारीचा दर १५ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. चीनने २०२० मध्ये बेरोजगारीचे प्रमाण ५.५ टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याचे लक्ष्य ठेवले होते. ग्लोबल तैवान संस्थेचे वरिष्ठ फेलो जे. मायकेल कोल यांनी आरोप केला की सीसीपीच्या ३००० नेत्यांची एकूण मालमत्ता ३५.५३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. हे लोक स्वार्थी, लोभी आणि त्यांच्या फायद्याचे बघतात. प्रत्येक एनपीसी प्रतिनिधीचे सरासरी भांडवल सुमारे १२२० कोटी रुपये असेल.

बीजिंगमध्ये काेराेनाचे १०६ रुग्ण; नाे गाे झाेन बनला, शाळा-कॉलेज बंद

बीजिंग | चीनची राजधानी बीजिंगमध्ये मंगळवारी बळी पडलेल्यांची संख्या १०६ वर गेली. शहरातील संसर्ग रोखण्यासाठी सतर्कतेची पातळी तिसऱ्या ते दुसऱ्या स्तरावर वाढवण्यात आली. बीजिंग चीनचे नवीन ‘नो गाे झोन’ बनले आहे. नगरपालिकेचे उपसचिव जनरल चेन बीई म्हणाले की, संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. आता वर्ग फक्त ऑनलाइन चालवण्यात येतील. बीजिंगमध्ये ११ जूनपासून हा संसर्ग वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...