आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Good Enthusiasm Among 18 To 20 Year Olds In Britain, Standing In A 1km Queue For Vaccines; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:ब्रिटनमध्ये 18 ते 20 वर्षीय तरुणांत चांगला उत्साह, लसीसाठी 1 किमी रांगेत उभे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसीकरणाने ब्रिटनची अर्थव्यवस्था 300 वर्षांच्या संकटातून बाहेर

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर मंदावलेल्या लसीकरण कार्यक्रमात आता तरुणांमुळे उत्साह संचारला आहे. देशातील ४६.६ टक्के लोकसंख्येला लस दिल्यानंतर तरूणांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. १८ ते २० वर्षीय तरुण लस घेण्यासाठी एक किमीच्या लांबच लांब रांगेत प्रतीक्षा करताना दिसून आले. शनिवारी पहिल्या दिवशी सात लाखांवर लोकांनी लसीसाठी नोंदणी केली होती. ताशी सुमारे ३० हजार लोकांना डोस दिला जात आहे. या रांगेत तरुणांबरोबरच वयस्करही आहेत.लसीकरणाकडे देशातील तरुण स्वातंत्र्याच्या अर्थाने पाहू लागला आहे.

लसीकरण झाल्यानंतर कधीही क्वाॅरंटाइन होण्याची वेळ येणार नाही. कोठेही फिरता येऊ शकेल, असा विश्वास तरुणांना वाटत आहे. त्याशिवाय तिसऱ्या लाटेच्या संकटाची चर्चाही आहे. मृत्यूचा आकडा स्थिर असला तरी शनिवारी १४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. पूर्वी फायझर, मॉडर्ना, अॅस्ट्राजेनेका या लसींच तुटवडा होता. गेल्या आठवड्यात ब्रिटनमध्ये केवळ ४.५ लाख डोस देण्यात आले होते. लसीकरणाचा वेग होता तेव्हा १२ लाखांवर डोस दिले जायचे. १८ जूनपर्यंत ७.३ कोटी डोस दिले गेले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४.२ कोटी लोकांना पहिला डोस देण्यात आला. ३.११ कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या उत्पादनातून ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी दिली आहे.

इकॉनॉमी बूस्टर : वर्क फ्रॉम होम, लॉकडाऊन इत्यादी अनेक योजनांमुळे सामान्यांची बचत वाढली, बचतीच्या १८ लाख कोटी रुपयांतून अर्थव्यवस्थेला बळकटी शक्य
ब्रिटनची अर्थव्यवस्था अनलॉकनंतर वेगाने संकटातून बाहेर पडू लागली आहे. येथील बाजारपेठेत लोक खरेदीसाठी पूर्वीसारखी गर्दी करू लागले आहेत. लोकांना मोकळेपणाने आवश्यक वस्तूंची खरेदी विक्री करता येत आहे. लसीकरणामधून लोकांमध्ये विश्वास वाढीस लागला आहे. त्यामुळे लोक विनासंकोच कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांत रोजगारात वाढ झाली आहे. मेपर्यंत २.८५ कोटी लोक पूर्ववत रोजगारावर परतले आहेत, असे एका पाहणीतून दिसून आले आहे. तसे तर ५ लाख ५३ हजार एवढ्या रोजगाराची अद्यापही गरज आहे. कारण कोरोनापूर्वी हीच स्थिती होती. गेल्या वर्षी अर्थव्यवस्थेने १० टक्के संकोच केल्याबरोबर अर्थव्यवस्था ३०० वर्षे मागे पडली होती. परंतु अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी श्रमिक व गरीब समुदायासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. रोजगार गमावणाऱ्याचे ८० टक्के वेतन सरकारने दिले. मात्र त्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली. त्याचा आता अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम इत्यादीमुळे बचत खात्यात १८ लाख कोटींची रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम विक्रमी मानली जाते. ब्रिटनच्या वार्षिक जीडीपीच्या १० टक्के एवढे त्याचे प्रमाण आहे. २०२० च्या शेवटच्या तिमाहीत बचत १६ टक्क्यांवर वाढली होती. १९६३ नंतरचा हा मोठा आकडा आहे. हा पैसा अनलॉकमध्ये बाजारात येईल. त्यातून अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असे तज्ञांना वाटते. परंतु पुढील काही दिवस लसीकरणाचा वेग मात्र मंदावता कामा नये. त्यावर बरेच काही अवलंबून असेल, असे जाणकारांना वाटते. अन्यथा तिसऱ्या लाटेचा धोका आहे.तो लक्षात घेऊन आरोग्य प्रशासनाला आता १८ वर्षांवरील लसीकरणाची मोहिम वेळेत पूर्ण करावी लागणार आहे.

अर्थव्यवस्थेचा ८.२ वेग शक्य
ब्रिटनच्या उद्योग वर्तुळातील एका अंदाजानुसार देशाची अर्थव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. देशाचा यंदाचा विकास दर ६ ते ८.२ टक्के राहील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. २०२२ मध्ये तो ५.२ ते ६.१ टक्के राहील. आयएमएफने ५.१ टक्क्यांचे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात हा विकास अपेक्षेपेक्षाही चांगला म्हटला पाहिजे.

तरुणांमधील डेल्टा व्हेरिएंटचेप्रमाण आठवड्यात ७९ % वाढले
लंडन क्लब चेल्सिया, टॉटेनहॅम फुटबॉल स्टेडियम लसीकरण सुरू आहे. तरुणांतील डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांच्या संख्येत आठवड्यात ७९ टक्के वाढल्याचे प्रशासनाने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...