आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Google Co founder Has Been On Trial For 7 Years, Accusing His Wife Of Deliberately Bringing In A Divorce Terrorism Portal

दिव्य मराठी विशेष:गुगल सहसंस्थापकाचा 7 वर्षांपासून खटला सुरू, पतीने डिव्हाेर्स टेररिझम पाेर्टल मुद्दाम आणल्याचा पत्नीचा आरोप

पालाे आल्टाे (कॅलिफाेर्निया) / डायसुके वाकाबायाशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक कंपनी गुगलचे तिसरे सहसंस्थापक स्काॅट हसन यांचा घटस्फाेटाचा खटला ७ वर्षांनंतरही संपलेला नाही. दाेघांमधील कुरबुरीनंतर २०१४ मध्ये घटस्फाेटासाठी अर्ज दाखल करण्यात आला हाेता. घटस्फाेट लांबण्यामागील कारण संपत्तीमधील वाट्याचे आहे. स्काॅट सुमारे १३,५०० काेटी रुपयांचे मालक आहेत. पत्नी एलीसन हाेन यांना घटस्फाेटाच्या बदल्यात त्यांच्या संपत्तीत निम्मा वाटा हवा आहे. स्काॅट यांनी मात्र त्यास विराेध केला आहे. आराेप-प्रत्याराेपामुळे पुन्हा वाद निर्माण झाला आहे. स्काॅट माझा सूड घेत आहेत. संकेतस्थळाच्या माध्यमातून डिव्हाेर्स टेररिझम पसरवले जात आहे. त्यामुळे मला संकाेचल्यासारखे वाटावे, असा स्काॅट यांचा उद्देश आहे. हाेनसाेबत १३ वर्षे घालवली आहेत. त्यांना घटस्फाेटाच्या बदल्यात माझी संपत्ती मिळवायची आहे, असा आराेप स्काॅट यांनी लेखातून केला आहे. घटस्फाेटाच्या प्रकरणाची सुनावणी कॅलिफाेर्नियाच्या सांता क्लॅरा काेर्टात सुरू आहे.

दाेघांनीही वेगळे हाेण्यासंबंधीची कागदपत्रे न्यायालयात पाठवली आहेत. स्काॅट मला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आराेप एलिसनने केला आहे. त्यामुळेच न्यायालयीन प्रक्रिया लांबवली जात आहे, असे मला वाटते. हाेनचे वकील पीयर्स आे डाेनेल म्हणाले, फेब्रुवारीला हसनने सूड घेण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू केले हाेते. त्यावर हसनने खटल्याशी संबंधित माहिती दिलेली हाेती. याबद्दल हाेनला आॅगस्टमध्ये माहिती मिळाली. स्काॅटचे विवाहबाह्य संबंध असल्याचे समाेर आल्यानंतर दाेघांमध्ये कुरबुरी वाढत गेल्या. या प्रकरणाची सुनावणी साेमवारी हाेणार आहे.

स्काॅट म्हणाले, पत्नीचे खरे रूप समाेर आल्याने पाेर्टल सुरू केले
हसनने संकेतस्थळ बनवल्याचे कबूल केले. परंतु आराेप एकतर्फी आहे. या अगाेदर गुगलचे सहसंस्थापक सर्जेई ब्रिन आर एन वाेजकीने ८ वर्षांपूर्वी साेबत राहिल्यानंतर २०१५ मध्ये घटस्फाेट घेतला हाेता. त्यासाठी त्यांनी एका खासगी न्यायाधीशाची मदत घेतली हाेती. खासगी गाेष्टी जगासमाेर येऊ नयेत. अलीकडेच बिल गेट्स, मेलिंडाचा घटस्फाेटही गुपचूप झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...