आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकुकीजचा वापर केल्यामुळे फ्रान्सने गुगल आणि फेसबुकला सुमारे १८०० कोटी रुपयांचा (२१ कोटी युरो) दंड ठोठावला आहे. कुकीजचा उपयोग डेटा युजर्सना ऑनलाइन ट्रॅक करण्यासाठी केला जातो. फ्रान्सच्या राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आणि स्वतंत्रता आयोगाने (सीएनआयएल) गुगलला आजपर्यंतचा सर्वाधिक म्हणजे सुमारे १,३०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. फेसबुकला ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयोगाने डिसेंबर २०२० मध्ये कुकीजचा वापर केल्याने गुगलला ९०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.
पुढील तीन महिन्यांत या कंपन्यांनी कुकीजबाबत बदल केला नाही तर रोज ८४ लाख रुपये दंड लावला जाईल. दरम्यान, गुगलने साइट्समध्ये बदल करू, असे म्हटले आहे. गुगलने म्हटले, ‘इंटरनेट युजर्सच्या अपेक्षांनुरूप आम्ही नवे बदल लागू करण्यासोबतच सीएनआयएलसोबत सक्रियरीत्या काम करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत.’
अॅपल आणि अॅमेझॉनसहित इतर अमेरिकी टेक कंपन्यांच्या विरुद्ध संपूर्ण युरोपमध्ये व्यवसायाबाबत दबाव वाढला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.