आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जगात प्रथमच...:गुगल-फेसबुक यांना बातम्यांसाठी द्यावे लागणार ऑस्ट्रेलियन माध्यमांना पैसे! तीन महिन्यांत देय रक्कम निश्चित करावी लागेल

सिडनी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेक कंपन्यांविरोधात या प्रकारचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश

अमेरिकन टेक कंपन्या फेसबुक आणि गुगलला आता ऑस्ट्रेलियन माध्यम क्षेत्रातील कंपन्यांकडून घेतलेल्या बातम्यांच्या आशयाचे पैसे द्यावे लागतील. स्वतंत्र पत्रकारितेचे रक्षण करण्यासाठी टेक कंपन्यांविरोधात या प्रकारचा निर्णय घेणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश आहे. या देशाच्या सरकारने यासाठी आचारसंहितेचा विशेष मसुदा प्रसिद्ध केला आहे. सध्या अशा प्रकारचा मसुदा न तयार केलेल्या देशांवरही याचा परिणाम दिसू शकतो. बातम्या आणि कंटेंटबाबत एखाद्या देशाने घेतलेल्या या निर्णयामुळे फेसबुक आणि गुगल या कंपन्यांनाही आता आपले धोरण बदलावे लागणार असून आर्थिक बाबतीत नव्या धोरणाचा विचार करावा लागणार आहे. या दोन्ही कंपन्यांनी अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

येत्या २८ ऑगस्टपर्यंत चर्चेनंतर हा मसुदा संसदेत मांडला जाईल, असे ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री जोश फ्रायडेनबर्ग यांनी सांगितले. वर्षाच्या अखेरपर्यंत याचे कायद्यात रूपांतर होईल. ते म्हणाले, ऑस्ट्रेलियन माध्यम कंपन्यांच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. यामुळे स्पर्धा, ग्राहकांची सुरक्षा वाढेल तसेच माध्यम क्षेत्रात स्थिरता येईल. दरम्यान, याअंतर्गत सुरुवातीला फेसबुक आणि गुगलकडून पैसे आकारले जातील. नंतर, इतर डिजिटल प्लॅटफॉर्मलादेखील पैसे देण्यास सांगितले जाईल. दुसरीकडे, टेक कंपन्यांकडे देय रक्कम निश्चित करण्यासाठी माध्यम क्षेत्रातील कंपन्यांशी चर्चा करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी असेल. तसेच यानंतरही यावर एकमत झाले नाही तर प्रकरण न्यायाधिकरणात जाईल. न्यायाधिकरणाचा निर्णय कंपन्यांना मान्यच करावा लागेल.