आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनबेरा:ऑस्ट्रेलियात प्रसारमाध्यम संस्थांना गुगल देणार मोबदला, बातम्यांसाठी नियम अनिवार्यतेस आधी होता विरोध

कॅनबेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबुकलाही आर्थिक मोबदला देण्याचा इशारा

ऑस्ट्रेलियाच्या दबावापुढे गुगलने गुडघे टेकले आहेत. गुगलने ऑस्ट्रेलियातील माध्यम संस्थांना बातम्यांसाठी पैशांचा मोबदला देण्याचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनीने शुक्रवारी न्यूज शोकेस नावाचा एक प्लॅटफॉर्मही सुरू केला आहे. त्यात बातम्यांसाठी मोबदला दिल्याचे दिसते. गुगलने आधी ऑस्ट्रेलिया सरकारच्या या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. हा कायदा मान्य केला जाणार नाही, असे वाटत होते. परंतु कॅनबेरा टाइम्ससह सात माध्यम संस्थांशी करार करून बातम्यांसाठी पैसे देण्याची गुगलने तयारी दर्शवली आहे.

न्यूज शोकेसला गुगलने गेल्या वर्षी जूनमध्ये ब्राझील व जर्मनीत आधीच सुरू केले होते. परंतु अल्फाबेट इंकची मालकी असलेल्या गुगलने ऑस्ट्रेलियातील मीडिया संस्थांच्या अनिवार्य मोबदला देण्याच्या प्रस्तावाकडे मात्र दुर्लक्ष केले होेते. आता ऑस्ट्रेलिया सरकारने अशाच प्रकारचा आदेश फेसबुकलादेखील दिला आहे.

ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारातील गुगलची भागीदारी ५३ टक्के व फेसबुकची २३ टक्के आहे. या कायद्याचे पालन झाले नाही तर दोन्ही कंपन्यांना मोठ्या प्रमाणात दंड भरावा लागू शकतो, अशी तरतूद नव्या कायद्यात करण्यात आली आहे.

भारतात अमेरिकी टेक कंपन्यांची कमाई : गुगल व फेसबुकसारख्या अमेरिकी टेक कंपन्या भारतातदेखील खूप कमाई करत आहेत. फेसबुक व गुगलने २०१८-१९ मध्ये आपल्या ऑनलाइन जाहिरातींच्या महसुलापैकी सुमारे ७० टक्के (११, ५०० कोटी रुपये) भारतातून कमावले. २०२२ मध्ये ही बाजारपेठ २८ हजार कोटी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...