आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:गूगल सर्च करणारे स्वत:ला स्मार्ट मानतात, भ्रमामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम

ऑस्टिन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणत्याही बाबतीत सर्च इंजिन गूगलवर माहिती शोधणारे लोक स्वत:ला इतरांपेक्षा स्मार्ट मानू लागतात. परंतु अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाच्या संशोधनानुसार गूगल सर्च करणारे लोक आत्मविश्वासाने वावरतात. संशोधकांनी काही लोकांना याबाबतची प्रश्नावली दिली. ही प्रश्नावली सोडवण्यासाठी काही लोकांनी आपल्या स्मरणशक्तीचा तर काहींनी इंटरनेट सर्च इंजिन गूगलचा वापर केला.

त्यापैकी गूगल करून उत्तर देणाऱ्या लोकांना स्वत:मध्ये आत्मविश्वास असल्याचे वाटत होते. संशोधनाचे नेतृत्व करणारे एडरिन वार्ड म्हणाले, गूगल करून उत्तर देणाऱ्यांना मात्र काही वेळानंतर तसेच दुसऱ्या दिवशी या प्रश्नांची उत्तरे आठवत नव्हती. इंटरनेटवर काही माहिती शोधल्यानंतर व्यक्तीला ती आपल्या स्मृतीच्या आधारे सांगितल्याचे वाटू लागते. मानसतज्ञ याला भ्रमाची स्थिती मानतात. अशा स्थितीत इंटरनेटवरील माहिती किंवा ज्ञान हे स्वत:चे आहे, असे व्यक्ती मानू लागतो. वास्तविक गूगलवर मिळालेली माहिती व्यक्ती केवळ वाचत असतो. खरी माहिती तर सर्च इंजिन गूगलच्या मेमरीमध्ये असते. त्यास वैज्ञानिक भाषेत आंतरिक व बाह्य ज्ञान असे म्हटले जाते. एखादा विद्यार्थी आपल्या शिक्षकाचे ज्ञान हे आपले ज्ञान आहे, असे मानतो. अगदी तशातलाच हा प्रकार असतो, असे तज्ञांना वाटते. वास्तवात व्यक्तीला आपल्या स्मृतीत माहिती साठवावी लागते. त्यानंतर व्यक्ती त्या स्मृतीवर आधारित संवाद साधू शकतो.

भ्रमामुळे निर्णय क्षमतेवर परिणाम
इंटरनेटवरील माहितीला ज्ञान मानण्याच्या गैरसमजातून लोकांमध्ये निर्णय घेण्याच्या क्षमतेवर देखील विपरित परिणाम होऊ लागला आहे. प्रत्येक गोष्टीत गूगलवरील अवलंबित्वामुळे बुद्धीच्या नैसर्गिक निर्णय क्षमतेत हळूहळू घट होत चालली आहे. परंतु त्याकडे सामान्यांचे लक्ष जात नाही.

बातम्या आणखी आहेत...