आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Google Will Notify The User If The Information Is Not Reliable; Will Alert That No Concrete Instructions Are Available On This Subject; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:माहिती विश्वासार्ह नसल्यास युजरला तसे कळवेल गुगल; या विषयावर ठोस सूचना उपलब्ध नसल्याचा अलर्ट देणार

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चूक वा अर्धवट माहिती रोखण्यासाठी गुगल नव्या फीचरची घेत आहे चाचणी

दिग्गज टेक कंपनी गुगलने सरतेशेवटी आमचे सर्व इंजिन सर्वज्ञानी नसल्याचे मान्य केले आहे. यामुळे एक नव्या फीचरची चाचणी करत आहे. त्यानुसार, सर्चचा रिझल्ट विश्वासार्ह जर नसेल किंवा तो वारंवार बदलत असेल तर गुगल युजर्सना त्याची तशी सूचना देईल. चूक वा अर्धवट माहिती रोखण्यासाठी गुगलने हा पुढाकार घेतला आहे. विशेषकरून २०२० मधील अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची वादग्रस्त निवडणूक व कोरोना महामारीबाबत खूप चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गुगल नवे फीचर आणत आहे. त्यानुसार, गुगल ब्रेकिंग विषयांवर युजर्सना अतिरिक्त माहिती व संदर्भ देण्याचे काम करत आहे.

तथापि, टेक तज्ज्ञांचा दावा आहे की सध्या हे फीचर काही सर्चमध्येच दिसत आहे. गुगल सर्चचे पब्लिक लायझनिंग प्रमुख डॅनी सुलिवन म्हणाले, कुणी गुगलवर सर्च करताे तेव्हा आम्ही सर्वाधिक प्रासंगिक व विश्वसनीय माहिती दाखवण्याचा प्रयत्न करते. मात्र बऱ्याचदा पूर्णपणे नवीन असलेल्या गोष्टी सापडतात. ब्रेकिंग बातम्या व अपडेट होत असलेल्या विषयांबाबत असे हमखास घडते. यामुळे आधी दिलेली माहिती सर्वात विश्वसनीय राहत नाही. कोणकोणते विषय केव्हा व किती वेगाने डेव्हलप होत आहेत याबाबत आम्ही आमच्या सिस्टिमला प्रशिक्षित केले आहे. तसेच त्यांचे स्रोत किती प्रामाणिक आहेत हेही युजर्सना जाणून घेता येईल.

िरझल्ट दाखवण्यासाठी एखाद्या विषयाची चांगली व पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याचे गुगलने गतवर्षी एप्रिलमध्येच युजर्सना कळवणे सुरू केले होते. फेब्रुवारीत कंपनीने अतिरिक्त संदर्भ देणारे ‘अबाउट’ बटण लाँच केले. गुगलमध्ये नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे (एफएक्यू) अमेरिकेपुरतीच मर्यादित असल्याचा आरोप होतो. हे फीचर इतर देशांतही देण्यासाठी कंपनी काम करत आहे.

प्रामाणिक माहिती नसल्यास मेसेज-रिझल्ट वेगाने बदलत आहेत
डॅनी सुलिवन यांनी एका उदाहरणाद्वारे हे प्रकरण समजावून सांगितले. नव्या फीचरनुसार गुगलवर ‘यूएफओ १०६ एमपीएच’ शोधल्यास ‘असे दिसते की सर्च रिझल्ट वेगाने बदलत आहेत’ असा एक अलर्ट मिळेल. तसेच ‘विश्वसनीय स्रोतांकडून रिझल्ट मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो’ असा सल्लाही युजरला दिला जाऊ शकतो. मात्र सोशल मीडियावर त्याची खूप चर्चा होत आहे. यामुळे हा विषय ‘ट्रेंडिंगमध्ये’ असल्याचे कळवले जाईल. तसेच ‘याबाबत ठोस माहिती उलपब्ध नाही याबाबत नवीन कंटेंट येईल’ असा अलर्टही मिळू शकतो.

बातम्या आणखी आहेत...