आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुगलचे सहसंस्थापक आणि ८.२३ लाख कोटी रु. संपत्तीचे मालक,जगातील सातवें धनाढ्य व्यक्ती सर्गेई ब्रिन आपल्या दुसऱ्या पत्नीला घटस्फोट देण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी स्थानिक न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ४८ वर्षीय सर्गेई यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये निकोल शानाहानशी गुप्तपणे लग्न केले होते. त्याचवर्षी निकोलला एक मुलगीही झाली. आता दोघे १५ डिसेंबर २०२१ पासून वेगळे राहतात. निकोल स्वत: वकील आणि आंत्रप्रोन्योर आहे.
मतभेद समझोत्याच्या पलीकडे गेले असल्याचे सर्गेई यांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकरणात कमालीची गोपनीयता राहावी असे त्यांना वाटते.कारण घटस्फोट अथवा संरक्षणाची माहिती जाहीर झाल्यास मुलीचे अपहरण अथवा तिला त्रास होण्याची भीती त्यांना वाटते. त्यामुळे खटला तत्काळ निकाली लागावा म्हणून मदतीसाठी त्यांनी एका खासगी न्यायाधीशाची नेमणूक केली आहे.
या खासगी न्यायाधीशाला ताशी ७३ हजार रुपये आणि त्यांच्या मदतनीसाला ताशी २३ हजार रुपये मानधन अदा केले जात आहे,असे अंतस्थ सुत्रांनी सांगितले. सर्गेई यांनी जानेवारीतच घटस्फोटाचा अर्ज दाखल केला असल्याचे सांगितले जाते. सन २०१५ मध्ये सर्गेई यांनी पहिली पत्नी एन.वोजकिक हिच्याशी काडीमोड घेतला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत.
सर्वात महागडा काडीमोड :
सर्गेई यांनी कितीही लपवाछपवी केली तरीही हा सर्वात महागडा घटस्फोट ठरु शकतो.
जेफ बेजोस यांनी 2019 मध्ये पहिली पत्नी मॅकेंझीशी काडीमोड घेतला त्यावेळी 2.92 लाख कोटी रु. मिळाल्याने मॅकेंझी धनाढ्यांच्या यादीत २२ व्या स्थानी होती.
मेलिंडाशी 2021 मध्ये काडीमोड घेतल्यावर बिल गेट्स यांनी ५ लाख कोटी रु.पोटगी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.