आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनचे शाही महालासारखे डिझाइन केलेले व तरंगणारे भव्य रेस्तराँ बंद झाले आहे. या जहाजावरील रेस्तराँने हाँगकाँगच्या एबर्डीन हार्बरहून निराेप घेतला. कँटाेनिज व सागरी भाेजनासाठी हे रेस्तराँ आेळखले जात हाेते. १९७६ मध्ये सुरू झालेले रेस्तराँ अनेक माेठ्या हस्तींच्या मेजवानीचे साक्षीदार ठरले. त्यात ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ (द्वितीय), जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींसह सुमारे ३० लाख लाेकांनी या तरंगत्या रेस्तराँमध्ये खवय्येगिरी केली आहे. परंतु २०२० मध्ये आलेल्या काेराेना महामारीने आलेल्या लाॅकडाऊनचा कहर झाला आणि रेस्तराँ बंद पडले. काेट्यवधींची देखभाल आणि कर्मचाऱ्यांवरील खर्च हे झेपत नव्हता.
देखभाल अशक्य, खरेदीदारही मिळेना : हे तरंगते रेस्तराँ चालवण्यासाठी नवीन मालकाचा शाेध घेण्यात आला. परंतु त्यात यश आले नाही. हाँगकाँग प्रशासनानेही बेल आऊट पॅकेज देण्यास नकार दिला. अखेर रेस्तराँ बंद पडले. रेस्तराँच्या सर्व कर्मचाऱ्यांना नाेकरी साेडावी लागली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.