आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Government Assistance Of Rs 7 Lakh To Each Needy; However, Online Hackers Are Stealing Money Under False Pretenses

दिव्य मराठी विशेष:प्रत्येक गरजूला सरकारची ७.५ लाखांची मदत; मात्र खोटी ओळख दा‌खवत पैसे चोरताहेत ऑनलाइन हॅकर

मेलबर्न2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती सुधारण्यासाठी गरिबांना मदत करण्याची योजना सुरू
  • पर्थमध्ये आठवडाभरात १५० जणांच्या खात्यातून ११.५ कोटी चोरले

ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये राहणाऱ्या अँगेली बॅसेट पतीसोबत बँकेत पोहोचल्या असता त्यांच्या खात्यातून १५ लाख काढण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांना कळाले. बँकेने सांगितले की, त्यांची ओळख, कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती. यामुळे आश्चर्यचकित झालेल्या पतीने आपण कुठल्याही प्रकारच्या ऑनलाइन ट्रान्सफरचा प्रयत्न न केल्याचे बँकेला सांगितले. यामुळे पेमेंट त्वरित थांबवण्यात आले. मात्र ऑस्ट्रेलियामध्ये सध्या अँगेलीसारखे हजारो लोक सायबर क्राइमचे बळी ठरत आहेत. अँगेली सांगतात, सरकारने आणखी सावधान आणि कठोर होण्याची आवश्यकता आहे, कारण हे पैसे सरकारचेच आहेत.  कोरोना संकटात दुर्बल झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी सरकारने एक योजना सुरू केली आहे. पैसे लवकर मिळावे यासाठी याला ‘फास्ट रीलिझ सुपर अ‍ॅन्युएशन स्कीम’ असे नाव देण्यात आले आहे. या पैशावर गुन्हेगारांचे लक्ष आहे. त्यासाठी ते नवीन मार्गांचा प्रयत्न करत आहेत. यातील उणिवांचा फायदा घेऊन त्यांनी कोट्यवधींची फसवणूक केली आहे. त्यांनी सरकारी वेबसाइटसारख्या अनेक साइट तयार केल्या आहेत. ज्यावर लोक त्यांचे तपशील शेअर करतात. यानंतर या तपशिलांचा गैरवापर करून ते बनावट ओळख, कागदपत्रे तयार करतात आणि ऑनलाइन प्रक्रियेमधून पैसे चोरतात. एकट्या पर्थमध्ये या घोटाळेबाजांनी एका आठवड्यात सुमारे दीडशे जणांची फसवणूक केली असून सुमारे ११.५० कोटी रुपयांची चोरी केली आहे.

तथापि, तक्रारीनंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आल्याचा सरकारचा दावा आहे. सरकारी संकेतस्थळावर नोंदवण्यात येत असलेल्या खात्यांची संख्या मर्यादित केली गेली आहे. लोकांची ओळख आणि कागदपत्रे कशी चोरी केली जातात यावर गृहमंत्री पीटर डटन म्हणाले, आयकर रिटर्न भरताना ही माहिती टॅक्स एजन्सींकडून लीक झाली किंवा चोरी झाली असावी.

माहिती मिळाल्यावर २ योजना बंद, मात्र चोरी सुरूच

एका टॅक्स अधिकाऱ्याला संशय आल्यानंतर तक्रार केली असता फसवणूक उघडकीस आली. सायबर गुन्हेगाराने सरकारी वेबसाइटसारखी वेबसाइट तयार करून लोकांची माहिती गोळा केली. नंतर त्याचा वापर त्याच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी केला. आता सरकार सुरक्षा वाढवण्याविषयी आणि कठोर उपाययोजना करण्याविषयी बोलत आहे.

0