आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:सरकारचे लक्ष ऑलिम्पिकवर होते, आणीबाणीसाठी विलंब; मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी असलेल्या जपानचेही हाल

टोकियोएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
शिनागावा स्थानक : सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. - Divya Marathi
शिनागावा स्थानक : सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.
  • संपूर्ण देशात आणीबाणी लागू शकते, ४ लाख लोकांवर संकट

जपानमध्ये कोरोना विषाणू संसर्गाबाबत सरकार उशिरा जागे झाले. त्यावरून लोकांमध्ये संताप आहे. त्यातूनच देशात ९ हजारांहून जास्त लोक बाधित आहेत, तर १७८ लोकांना प्राण गमवावे लागले. टोकियोत २६०० लोक बाधित आहेत. देशात १६ जानेवारी रोजी पहिली केस सापडली होती. २७ फेब्रुवारीला पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी देशातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश काढले. फेब्रुवारीत डायमंड प्रिन्सेस जहाजावर ७०० हून जास्त लोक कोरोनामुळे बाधित झाल्याचे आढळून आले होते. पहिला रुग्ण आढळल्यानंतर ८३ दिवसांनंतर आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. राष्ट्रीय प्रसारण संस्था एनएचकेच्या म्हणण्यानुसार देशातील नऊ प्रांतातील रुग्णालये कोरोना बाधित रुग्णांनी फुल्ल झाले आहेत. आणीबाणीसाठी असलेल्या खाटाही शिल्लक राहिलेल्या नाहीत, अशी स्थिती आहे. टोकियो, क्युडो, ह्यूगो, फुकुआेका इत्यादी सारख्या मोठ्या प्रांतातही दयनिय स्थिती आहे.  जपानचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आेसाकाच्या स्थानिक प्रशासनाने लोकांना वॉटरप्रूफ काेट व रेनकोट दान करण्याचे आवाहन केले आहे. कारण आरोग्य कर्मचाऱ्यांकडे सुरक्षा किट नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. आेसाकाचे महापौर पत्रकार परिषदेत म्हणाले, देशातील अनेक शहरांत डॉक्टर व नर्सना सुरक्षा उपकरण नसतानाही उपचार करावे लागत आहेत. 

क्युटोच्या दोशिशा विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर नॉरिको हामा म्हणाल्या, देशाची ही स्थिती पाहता संकटाविषयी सरकार किती गंभीर आहे, हे लक्षात येते. नेमके करायचे काय? हेच सरकारला ठाऊक नाही. चूक होईल म्हणून अनेक निर्णायक पावले उचलण्यात सरकार कचरले. सामान्य लोक आर्थिक तंगीत जगत आहेत. त्यांना सध्या काहीही सुविधा मिळत नाहीत. लहान व्यावसायिकांचेही हाल आहेत. संकट आलेले असतानाही सरकारचे सर्व लक्ष आॅलिम्पिकवर होते, ही गोष्ट सामान्यांना आवडलेली नाही. त्यावरून नागरिक सरकारवर संतप्त आहेत. कोणत्याही स्थितीत स्पर्धा जुलैपर्यंत घेण्याची सरकारची तयारी होती. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने समर गेम्स व पॅरालिम्पिक रद्द केल्याच्याही अनेक दिवसांनंतर सरकारने आणीबाणी जाहीर केली. 

सत्ताधारी डेमोक्रॅटिक पार्टीचे समर्थक असलेल्या लोकांनाच व्यवसायात मदत केली जात आहे. त्यावर लोक रोष व्यक्त करणार नाहीत तर काय? असा प्रश्नही हामा विचारतात. टोकियो विद्यापीठातील २० वर्षीय विद्यार्थी इसेह इजावा म्हणतो, माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्रस्त आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत शुल्क भरावे लागेल. परंतु, सरकारने आतापर्यंत तरी दिलासा देणारी काहीही घोषणा केलेली नाही. आम्ही ही समस्या कुटुंबाला देखील सांगू शकत नाहीत. कारण ते लोकही आधीच त्रस्त आहेत. प्रोफेसर मिको नकाबयाशी म्हणाल्या, देशाच्या नेतृत्वामधील कमकुवत बाजू स्पष्ट दिसते. 

संपूर्ण देशात आणीबाणी लागू शकते, ४ लाख लोकांवर संकट

कोरोनाबाबत जपानच्या होक्काइदो विद्यापीठाने अभ्यास केला आहे. त्यात शिंजो अॅबे सरकारची झोप उडाल्याचे म्हटले आहे. सरकारने कठोर पावले उचलली नाहीत तर ४ लाख लोकांचे प्राण जाऊ शकतात, असे त्यात नमूद केले आहे. त्यामुळेच अॅबे संपूर्ण देशात आणीबाणी लागू करू शकतात. देशात लक्षणे आढळलेल्या लोकांचीच तपासणी केली जात आहेे. त्यामुळे समस्येत वाढ झाली. 

बातम्या आणखी आहेत...