आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Government Hospitals In Brazil Are 90% Full, Corona Is Spreading Among Fruit And Vegetable Sellers In Peru

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना व्हायरस:ब्राझीलमधील सरकार रुग्णालये 90 % भरली, पेरूत भाजीपाला-फळ विक्रेत्यांमधून होतोय कोरोनाचा प्रसार

साओ पाउलो/ लीमाएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • लॅटिन अमेरिकी देशांतील आरोग्य यंत्रणेवर ताण

कोरोनामुळे अमेरिकेची स्थिती बिघडली आहे. लॅटीम अमेरिकी देशाची परिस्थिती देखील सातत्याने बिघडत आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठे शहर साओ पाउलोचे महापौर ब्रूनो कोवास यांनी इशारा दिला आहे की, कोरोना विषाणूमुळे रुग्णालयांमध्ये इमरजन्सी बेडची मागणी वाढली आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. देशातील सर्व सरकारी रुग्णालये क्षमतेच्या तुलनेत ९० टक्क्यांपर्यंत भरले आहेत आणि येणाऱ्या रुग्णांसाठी आठवडाभरात जागेची समस्या भासू शकते. साओ पाउलोवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे आतापर्यंत ३००० पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. नागरिकांसाठी लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर करण्याचे कोवास यांचे मत आहे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत ब्राझील जगात चौथ्या क्रमांकावर आहे. देशात २.४ लाख रुग्ण असून १६ हजाराहून जास्त मृत्यू झाले.

दुसरीकडे पेरूमधील लीमातील प्रमुख बाजारामध्ये प्रत्येकी पाच विक्रेत्यापैकी एक कोरोनाबाधित आहे. सुमारे ७९ टक्के जण पॉझिटिव्ह असूनही बाजार बंद करण्यात आलेला नाही. देशात कोरोना पसरण्याचे कारण असे बाजारच आहेत. सरकार फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनमध्ये पूर्णपणे अपयशी ठरले आहे. येथे ९२,२७३ लोक कोरोनाच्या विळख्यात आहेत. तर २६४८ जणांचा मृत्यू झाला आहे. पेरुते राष्ट्राध्यक्षांनी भाजीपाला विक्रेत्यांना बदलण्याचा सल्ला दिला मात्र बाजार बंद केले नाहीत.

बातम्या आणखी आहेत...