आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगभरात वेगाने घडणाऱ्या घडामाेडींत अमेरिका व ब्रिटनमधील सरकार राजकीय वातावरणाबद्दल अचूक भाकीत करणारी टीम तयार करू लागले आहे. नाेकरशहांच्या या टीमला सुपरफाेरकास्टर्स असे म्हटले जाते. हे नाेकरशहा चालू घडामाेडींचे साधक-बाधक विश्लेषण करतात. उदाहरणार्थ रशिया-युक्रेन युद्ध, चीन-तैवान संघर्षावरून सुरू असलेले कारस्थान, वाढती महागाई इत्यादीविषयी ही टीम विश्लेषण मांडते. त्याआधारे भाकीत करणारे माॅडेल मांडले जाते. अशा मुद्द्यांवर सरकारने काय निर्णय घ्यावा किंवा अशा घडामाेडींचे परिणाम काय हाेऊ शकतात याबद्दल सुपरफाेरकास्टर्स सल्ला देतात.
आधीच्या घटना, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि इतर डेटाचे विश्लेषण करून सुपरफाेरकास्टर्स व्यक्ती पूर्वानुमान लावताे. घटनांचा पूर्वअंदाज घेण्यासाठी आधुनिक विश्लेषणात्मक व आकड्यांचा वापर केला जाताे. अशा प्रकारचा पूर्वामान करणाऱ्या व्यक्तीचा अंदाज विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा सामान्य लाेकांच्या तुलनेत जास्त अचूक ठरताे. सुपरफाेरकास्टर्स तज्ज्ञांपेक्षा उजवे ठरतात कारण त्यांना काेणत्याही पूर्वग्रहाची बाधा झालेली नसते. नाेबेल विजेता डॅनियल कन्नमन म्हणाले, अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये काॅग्निटिव्ह इंटेलिजन्स असताे. एखादा प्रश्न एेकल्याबराेबर त्याबद्दलचा विचार त्यांच्या मनात सुरू हाेताे. त्यानुसार भविष्यात काेणता अंदाजित घटना सर्वाधिक चुकीचे ठरेल, याचा ते विचार सुरू करतात. ते याच संकल्पनेवर काम करतात.
विशेष प्रशिक्षणाद्वारे घटनांचा पॅटर्न समजू शकतात राजकीय तज्ज्ञ फिलिप टेटलाॅक यांच्या म्हणण्यानुसार फाेरकास्टर्सला विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यात घटनांचा पॅटर्न समजावून सांगितला जाताे. रशियाचा पुढील डाव काय असू शकताे? त्यासाठी रशियाच्या डेटाला समजून घेतले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.