आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Grammy: Ricky Cage Of Indian Descent, Falguni Starred; Aroj Aftab Gives First Award To Pakistan, Indian Fans Disappointed By Lata Mangeshkar Bappid |Marathi News

दिव्य मराठी विशेष:ग्रॅमी : भारतीय वंशाचे रिकी केज, फाल्गुनी झळकले; अरोज आफताबने पाकिस्तानला दिला पहिला अवॉर्ड, लता मंगेशकर-बप्पीदांच्या विस्मरणाने भारतीय चाहते निराश

लास वेगास4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत जगतातील सर्वात मोठा शो ६४ व्या ग्रॅमी पुरस्कार २०२२ दरम्यान भारतीय चाहत्यांची निराशा झाली. मात्र, भारतीय वंशाचे अमेरिकी संगीतकार रिकी केज आणि गायिका फाल्गुनी शहा यांनी ग्रॅमी पुरस्कार जिंकला. रिकी केजला दुसऱ्यांदा तर फाल्गुनी शहाला प्रथमच हा पुरस्कार मिळाला. पाकिस्तानची अरोज आफताबला बेस्ट ग्लोबल म्युझिकल परफॉर्मन्स आणि ओलिव्हियाला सर्वोत्कृष्ट नवाेदित कलाकाराचा पुरस्कार मिळाला. ब्रुकलिनची रहिवासी पाकिस्तानी गायिका अरोज आफताबने रविवारी आपला पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला. भारताच्या महान गायिका भारतरत्न लता मंगेशकर आणि बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहण्यात न आल्यामुळे भारतीय चाहते नाराज दिसले. फाल्गुनी शहाला ‘अ कलरफुल वर्ल्ड’ अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला.

झेलेन्स्कींचे भावुक आवाहन; उद्ध्वस्त शहरे, मेलेली माणसे, तुम्ही ही शाश्वत शांतता संगीतातून भरून काढा समारंभादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा एक प्रिरिकॉर्डेड व्हिडिओ लावण्यात आला. यात त्यांनी जगाला युक्रेनला मदत व समर्थनाचे आवाहन केले. झेलेन्स्कींनी भावुक व्हिडिओ संदेशात म्हटले, ‘आमच्या प्रियजनांना माहिती नाही की आम्ही सोबत राहू किंवा नाही. कोण वाचेल आणि कोण कायमचा शांत होईल, हे निवडण्याची परवानगी आम्हाला युद्ध देत नाही. आम्ही स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत. जगण्यासाठी, प्रेमासाठी. आम्ही रशियाशी लढत आहोत. उद्ध्वस्त झालेल्या शहरांचा गोंगाट, मेलेली माणसे आणि त्यांची कायमची शांतता. ही शांतता संगीताद्वारे भरून काढा.

बातम्या आणखी आहेत...