आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानातवंडांच्या तुलनेत आजी-आजाेबांचे प्रमाण जास्त असल्याचे जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच दिसून येते. संयुक्तच नव्हे तर एकल कुटुंबात राहणाऱ्या मुलांनाही आजी-आजाेबांचे प्रेम मिळत आहे. आई-वडील नाेकरी करत असल्याने आजी-आजाेबांची गरज वाढली आहे. अमेरिकेसह बहुतांश देशांत लहान मुलांचा सर्वाधिक वेळ आजी-आजाेबांसाेबत जाताे. परंतु त्यात आजाेबांना आपल्या नातवंडांशी संवाद साधताना अडचणी जाणवू लागल्या आहेत. त्यासाठी त्यांना आजींकडून टिप्स घ्याव्या लागत आहेत. ७१ वर्षीय जाॅर्ज सेवित्झर यांच्या मुली माेठ्या हाेत हाेत्या. तेव्हा ते व्यवसायाच्या निमित्ताने सतत धावपळ करत हाेते. म्हणूनच त्यांना नातवंडांची देखभाल म्हणजे जणू दुसरी संधी वाटते. त्यामुळेच ते पत्नीकडून टिप्स घेतात. ६३ वर्षीय टेड पेज म्हणाले, मी आजाेबा झालाे तेव्हा नातवंडांशी कसे वागावे हेच मला कळत नव्हते. मी जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करत हाेताे. मला इतर आजाेबांचे अनुभव एेकायचे हाेते. त्यांचे नातवंडांशी कसे संबंध आहेत, हे मला जाणून घ्यायचे हाेते. वयाच्या या टप्प्यावर कसे वर्तन असले पाहिजे याविषयी माझ्या मनात काही प्रश्न हाेते. मी इंटरनेटवर सर्च केले. तेथे मला ग्रँड पॅरेंटिंगवर अनेक ब्लाॅग आढळून आले हाेते.
आजींसाठी काही ग्रुपही हाेते. त्या चॅटिंगही करत हाेत्या. मी गुड ग्रँडपा नावाची वेबसाइट सुरू केली. त्यात आजाेबांसाठी पालकत्वाच्या टिप्स हाेत्या. ग्रेग पायने यांनीही असाच अनुभव सांगितला. आजाेबा झालाे तेव्हा ग्रँड पॅरेंटिंगसाठी पुस्तके शाेधली. ती मिळाली नाहीत. मग चित्रपटांचा धांडाेळा घेतला. त्यातही एक चित्रपट हाेता- ‘बॅड ग्रँडपा’. त्यात मद्यपी आजाेबा ८ वर्षीय नातवंडांकडे दुर्लक्ष करताे, असे कथानक आहे. ही परिस्थिती पाहिल्यावर आपल्यासारख्या लाखाे लाेकांची गरज आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर मी ‘कूल ग्रँडपा’ नावाचे पाॅडकास्ट सुरू केले.
संगाेपनात आजी-आजाेबांचे याेगदान केवळ सहकार्यापुरतेच युनिव्हर्सिटी आॅफ पुगेट साउंडचे समाजशास्त्रज्ञ जेनिफर युट्राटा म्हणाल्या, आजाेबा मंडळींचे याेगदान मुलांच्या संगाेपनात केवळ सहकार्य करण्यापुरते मर्यादित आहे. त्यात निगराणीचे काम आजीच करतात. त्याच वेळापत्रक व खानपानही ठरवतात. आजाेबा मंडळी त्याची केवळ अंमलबजावणी करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.