आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये ९४% मुले सरकारी शाळांत शिकतात. मात्र, देशातील ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारख्या अव्वल संस्थांत प्रवेश घेण्यात खासगी शाळांतील तरुणाईचा दबदबा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत अव्वल संस्थांमध्ये सरकारी शाळांत शिकलेल्या युवांची संख्या वेगाने वाढली आहे. २०१३ मध्ये ऑक्सफर्डमध्ये ५७% आणि केम्ब्रिजमध्ये ६१% युवा सरकारी शाळांत शिकणारे होते. अन्य नामांकीत संस्थांमध्ये खासगी शाळांच्या तुलनेत सरकारी शाळांत शिकलेल्या युवांचा आकडा कमी होता. मात्र, एका दशकापासून ऑक्सब्रिजमधील(↔ऑक्सफर्ड-केम्ब्रिज) प्रवेशांत सरकारी शाळेच्या युवांची संख्या वाढत आहे.. २०२२ मध्ये ऑक्सफर्डमध्ये ६८% आणि केम्ब्रिजमध्ये ७२.५% प्रवेश सरकारी शाळेतील युवांचे आहेत. २४ प्रतिष्ठित विद्यापीठांच्या रसेल ग्रुपचे अनेक सदस्य संस्थांमध्येही सरकारी शाळांतील विद्यार्थी वाढत आहेत. ग्रुपचे पॉलिसी हेड होली चँडलर यांच्यानुसार, आम्ही कमकुवत वर्गातील युवांची संख्या वाढवत आहोत.
सरकारी शाळांत शिकलेल्या युवांची संख्या वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. सटन ट्रस्ट संघटनेच्या २०१८ मधील अहवालानुसार, २९०० सरकारी शाळांत मिळून जेवढ्या युवांना ऑक्सब्रिजमध्ये प्रवेश मिळाला तेवढ्या संख्येत केवळ ८ शाळांतील युवांना प्रवेश मिळाला.
शिक्षणाचा दर्जा घसरत नाही, उलट निकालात सुधारणा सरकारी शाळांतील युवांच्या प्रवेशामुळे दर्जातील घसरणीचा युक्तिवाद करत संस्थांच्या प्रयत्नांवर टीका केली जात आहे. ऑक्सफर्डमध्ये मेन्सफिल्ड कॉलेजच्या प्रिन्सिपल हेलेन माउंटफिल्ड म्हणाल्या, ९५% विद्यार्थी सरकारी शाळांतील आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.