आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:सजग स्थानिक माध्यमांमुळे बांगलादेशात लोकांत हवामानाबाबत प्रचंड जागरूकता

ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सीतारंग चक्रीवादळामुळे बांगलादेशची राजधानी ढाकासह प्रमुख शहरे काही दिवसांपूर्वी अंधाराशी झुंज देत होती. पण देशातील जनता मात्र हवामान बदलाबाबत अजिबात ‘अंधारा’त नाही. चक्रीवादळ किंवा वादळे अधिक शक्तिशाली आणि विनाशकारी बनले आहेत हे त्यांना समजले आहे. बांगलादेशींना त्याचे गांभीर्य याेग्य रीतीने समजले आहे. कारण स्थानिक माध्यमांनी बऱ्याच काळापासून हवामानातील बदलांना महत्त्वाच्या बातम्या मानले आहेत. त्यांच्या मते त्याची माहिती लोकांना असणे आवश्यक आहे.

इजिप्तच्या कॉप्स २७ परिषदेत हवामान आणीबाणी हादेखील महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत जगातील बडे देश बांगलादेशकडून नक्कीच धडा घेतील, अशी अपेक्षा आहे. विक्रमी उष्णता, दुष्काळ, आग आणि पूर यांनी मानवाला त्रास दिला आहे. त्यासाठी अनेक उपायांवर काम केले जात आहे. परंतु बांगलादेशी तज्ज्ञांच्या अनुभवावरून असे दिसून येते की, याहूनही अधिक आणि चांगले बातम्यांचे कव्हरेज हा एक महत्त्वाचा उपाय आहे. कारण यामुळे सरकारांवर आणि शक्तिशाली हितसंबंधांवर व्यापक जागरूकता आणि सार्वजनिक दबाव वाढतो, जाे याेग्य उपाययाेजनांसाठी उपयुक्त ठरताे. बांगलादेशातील हवामानतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांमध्ये हवामान बदलाचा अहवाल कमी करण्याचा किंवा चुकीचा अहवाल देण्याचा अमेरिकेचा इतिहास आहे.

तिन्ही अमेरिकन निवडणुकांच्या वादविवादांमध्ये हवामानावरील एकही प्रश्न नाही : माध्यम नियंत्रक मीडिया मॅटर्सचा दावा आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे नेतृत्व असताना अमेरिकेतील न्यूज आउटलेट्सने जागतिक तापमानवाढीमुळे महानगरांचे तापमान वाढते आहे, हे न सांगता कार्दशियनला ४० पट अधिक कव्हरेज दिले होते. २००८, २०१२ आणि २०१६ मध्ये राष्ट्रीय पातळीवर प्रसारित झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या चर्चांदरम्यान नियंत्रकांनी उमेदवारांना हवामान बदलाबद्दल एकही प्रश्न विचारला नाही. अलिीकडच्या वर्षांत कव्हरेज किंचित वाढले आहे, परंतु २०२१ मध्ये एबीसी, सीबीएस, एनबीसी आणि फॉक्स न्यूजच्या एकूण बातम्यांपैकी केवळ १% हवामानविषयक बातम्या हाेत्या. जगातील दोन सर्वात मोठ्या नद्या, ‘गंगा आणि ब्रह्मपुत्रा’च्या सामुद्रधुनीवर वसलेला बांगलादेशचा एक अत्यंत खालचा किनारा आहे जो हिंदी महासागराला समाेरा जाताे. त्या परिसरात लाखो लोक राहतात. त्यांना नद्यांना आलेला पूर तसेच समुद्रातील चक्रीवादळ आणि समुद्राची वाढती पातळी यामुळे धोका आहे, ज्यामुळे किनारपट्टीची माती हळूहळू खारट होत आहे आणि भाताचे उत्पन्न धोक्यात येत आहे. त्यामुळे हवामान बदल हा बांगलादेशसाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि त्यांची प्रसारमाध्यमे त्यानुसार बातम्या देतात. बहुतेक टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि डिजिटल माध्यमांमध्येही नियमितपणे हवामानावर बातम्या चालवतात. आणि त्यांना प्रभावीपणे सादर करतात. बांगलादेश टीव्ही सारख्या सरकारी चॅनेलसह, चॅनल ‘आय’ सारख्या खासगी चॅनल देखील हवामानावर आधारित बातम्या ठळकपणे दिल्या जातात. याशिवाय लोकप्रिय टॉक शोमध्येही हा मुद्दा प्रचंड चर्चेत असतो. बांगलादेशी पत्रकार आणि न्यूजरूम हवामानाच्या बातम्यांबद्दल जागरूक झाले कारण त्यांना तज्ञांनी तसा सल्ला दिला.

सलीमुल हक हे चार बांगलादेशी हवामान तज्ञांपैकी एक आहेत ज्यांनी २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या आंतरसरकारी पॅनलच्या हवामान बदलाच्या तिसऱ्या मूल्यांकन अहवालाचे लेखक म्हणून काम केले. त्यावेळी, बांगलादेशातील धोरणकर्ते आणि पत्रकार या दोघांमध्ये हवामान बदलाबाबत फारशी जागरूकता नव्हती. त्यामुळे ते त्यांचे सहकारी अतिक रहमान, मीझान खान आणि ऐनून निशात यांच्यासह या विषयावर सक्रिय झाले. दरम्यान, या बाबतीत बांगलादेश किती कमकुवत आहे हे अप्रत्याशित हवामान घटनांवरून दिसून येत होते. विशेषत: नाेव्हेंबर २००७ मध्‍ये आलेल्या ‘कॅटेगरी ५’ च्या चक्रीवादळाने माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. आयपीसीसीने सहा आठवड्यांपूर्वी आपला चौथा मूल्यांकन अहवाल प्रसिद्ध केला. या पत्रकारांच्या आधीच्या अनुमानांमुळे, बांगलादेशी पत्रकारांनी आता त्यांना सातत्याने मुलाखतीसाठी सतत विनंत्या केल्या. जेणेकरून त्यांना हे समजू शकेल की सिद्रसारखे चक्रीवादळे जागतिक तापमान वाढीशी कसे संबंधित आह. ज्याच्या मदतीने ते नागरिकांनाला सावध करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बांगलादेशी प्रिंट आणि डिजिटल आऊटलेट्समध्ये, ढाका ट्रिब्यून, प्रोथोम एलो आणि इतर आघाडीची वर्तमानपत्रे हवामान आव्हानाच्या विविध पैलूंवर सखोल बातम्या आणि मतप्रदर्शन करणारे लेख देतात. हक यांनी स्वत: देशाच्या आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्र, डेली स्टारच्या साप्ताहिक हवामान स्तंभ लेखनात दीर्घकाळ योगदान दिले आहे. बंगालीमध्ये प्रकाशित किंवा प्रसारित करणाऱ्या बातम्यांचे भागीदार त्यांच्या स्तंभांमधील माहिती आणि कल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाचक आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारे कव्हरेज तयार करण्यासाठी करतात. परिणामी, बांगलादेशातील सामान्य माणसालाही हवामानाची चांगली माहिती असते.

बातम्या आणखी आहेत...