आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रीस ते माल्टादरम्यान तब्बल 400 प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवाशी जहाज भरकटले आहे. यामुळे या प्रवाशांचे प्राण संकटात सापडलेत. सागरी वाहतुकीवर नजर ठेवणाऱ्या अलार्म फोनच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात आली नाही, तर या प्रवाशांचे प्राणही जाऊ शकतात.
या जहाजाचे इंधन संपले आहे. तसेच त्याच्या एका भागात पाणी भरल्याचेही वृत्त आहे. प्रवाशांनी तुडुंब भरलेले हे जहाज लीबियाच्या तोबुर्कला जात होते. या लोकांच्या बचावासाठी अद्याप कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही.
माल्टाने वाचवण्यास दिला नकार
जर्मनीच्या वॉच इंटरनॅशनल नामक NGO च्या वृत्तानुसार, प्रवाशी जहाजाजवळ माल्टाचे 2 मर्चंट जहाज उपलब्ध आहेत. त्यानंतरही तेथील प्रशासनाने बचाव मोहीम राबवण्यास नकार दिला आहे.
वृत्तानुसार, माल्टाने या जहाजाला केवळ इंधन देण्याचे आदेश दिलेत. गंभीर बाब म्हणजे या जहाजावर एक गरोदर महिला, एक मुलगा व एक दिव्यांगही आहे. त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे.
रविवारी 23 प्रवाशांचा मृत्यू
वेगवेगळ्या देशांतील निर्वासित दररोज अवैध मार्गाने विशेषतः सागरी मार्गाने युरोपात शिरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी अनेकजण आपले प्राणही गमावतात. रविवारी युरोपला येणारे एक जहाज बुडाल्याने भूमध्य समुद्रात तब्बल 23 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
या जहाजातील 25 जणांना एका विशेष ऑपरेशनद्वारे वाचवण्यात आले होते. दरम्यान, गत आठवड्यातच 11 तासांच्या मोहिमेनंतर माल्टातून 440 प्रवाशांना वाचवण्यात आले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.