आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेजर जनरल (रिटायर्ड) शेरसिंह मोहालीत गुप्तचर मुख्यालयावरील हल्ल्यात वापरलेले ग्रेनेड आरपीजी तालिबानने पाकिस्तानला विकले होते. खरे तर अमेरिकेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर सुमारे ७० अब्ज डॉलर म्हणजेच ७० हजार कोटी रुपयांची ही शस्त्रे तालिबानच्या ताब्यात आली होती. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी तालिबान ही शस्त्रे पाक दहशतवादी संघटना आणि आयएसआयला विकत आहे.
दोन दशकांपूर्वी अमेरिकेने अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी खरेदी केले हे ग्रेनेड
दोन दशकांपूर्वी लादेनच्या शोधात अफगाणिस्तानात घुसलेल्या अमेरिकन सैन्याने अफगाण सैन्याला तालिबानशी लढण्यासाठी प्रशिक्षण दिले. अमेरिकन शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणाला अधिक वेळ लागतो म्हणून अमेरिकेने रशियाला लागून असलेल्या पूर्वेकडील देशांकडून आरपीजीसारखी शस्त्रे खरेदी केली आणि ती अफगाण सैन्याला दिली. त्यामुळे एका आठवड्यात फायटर तयार झाले.
आरपीजी : ३०० मीटर मारक क्षमता : हे टँकविरोधी शस्त्र आहे,जे पायदळ वापरतात. सध्या रशिया आणि चीन लष्कराकडे अशी शस्त्रे आहेत. टँकव्यतिरिक्त ते बंकर,लहान इमारत त्वरित पाडू शकते.
रेंज : २०० ते ३०० मीटर प्रती सेकंद. मारक क्षमता.
ग्रेनेड : २.६२ किलो, पूर्ण हत्यार: ४०-४२ किलो.
शब्दांकन : डी. डी. वैष्णव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.