आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिद्द आणि प्रचंड आशावादाचे दुसरे नाव म्हणजे जपान. बहुदा म्हणूनच नैसर्गिक आपत्तीनंतर त्याला दुप्पट ताकदीने तोंड देत जपान उभे राहिले आहे. २०११ मध्ये आजच्या दिवशी दुपारी ३ च्या सुमारास ९ रिश्टर क्षमतेचा भूकंप आला. नंतर किनारपट्टीवर ४० मीटर उंचीच्या अक्राळविक्राळ लाटा उसळल्या आणि सुनामीचे संकट धडकले. या अजस्र लाटांनी वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टींना गिळंकृत केले. त्यात १५८९९ लोकांचे प्राण गेले. २५०० लोक बेपत्ता आहेत. सुनामीच्या घटनेला १० वर्षे पूर्ण झाली. त्यात सर्वात उद्ध्वस्त मिनामिसानरिकू, इशिनोमाकी व लिटेट या तीन शहरांची सद्य:स्थिती ‘भास्कर’ने जाणून घेतली. ही शहरे केवळ उभी राहिली नाही तर ती वेगाने धावू लागल्याचे या शहरांच्या भेटीतून लक्षात आले.
जिद्द : किरणोत्सर्गाचा तडाखा बसलेल्या भागात आता वर्दळ
२०११ मध्ये फुकुशिमा दाइची आण्विक प्रकल्पाने आगीत तेल टाकण्याचे काम केले. इशिनोमाकी शहरापासून १४० किमी दक्षिणेकडे आहे. किरणोत्सर्गाचे फुगे उत्तर-पश्चिमेच्या दिशेने हवेच्या साहाय्याने पुढे सरकले आणि मार्गात आलेले शहर, गाव, शेती व जंगलांना विषारी करत गेले. हजारो लोकांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. कारण, या प्रकल्पाचे तीन रिअॅॅक्टर वितळले होते. लिटेट नावाचे गाव त्याचे उदाहरण आहे. हे गाव किरणोत्सर्गानंतर हलवण्यात आले होते. ५८०० लोकांनी फुललेल्या लिटेटमध्ये २०१६ पासून पुन्हा लोक राहायला येऊ लागले आहेत. सुमारे १५०० लोक येथे आले आहेत. गेल्या वर्षी या गावातील लोकांनी महापौराची निवड केली. युद्धाच्या काळास तोंड दिलेले आहे. मग आण्विक गोष्टीला घाबरायचे कशाला, असे आवाहन त्यांनी केले. आधी येथील लोक शेतीवर अवलंबून होते. मात्र किरणोत्सर्गाने शेतीची हानी झाली. कडक तपासणीनंतर काही पिकांना अनुकूल असल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. परंतु त्याच्या खरेदीसाठी कोणीही आले नाही. येथून निघून गेलेल्या लोकांना पुन्हा गावात आणणे याला माझे प्राधान्य असल्याचे नवीन महापौरांनी सांगितले. येथे सुमारे ३ हजार हेक्टर जमीन आहे. ही जमीन राहणे व शेतीसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. आज २८ वर्षीय नाना मॅट्सुमोटो यांच्यावर लोकांना परत आणण्याची जबाबदारी आहे.
आशा : उद्ध्वस्त इसिनोमाकी पुन्हा उभे, बाजारपेठेत गर्दी
सुमारे ५० किमी दक्षिण बाजूला किनारपट्टीवरील इशिनोमाकी शहर. या क्षेत्रातील हे सर्वात मोठे शहर आहे. २०११ च्या आपत्तीत हे शहर उद्ध्वस्त झाले होते. रस्त्यांचे नुकसान झाले होते. पूल वाहून गेले होते. ते पुन्हा तयार करण्यात आले. काँक्रीटच्या बंधाऱ्यांनी नद्यांवर नियंत्रण आणण्यात आले आहे. एक दशकापूर्वी किताकामी नदीने शहराला उद्ध्वस्त केले होते. पाणी शहरातील अरुंद गल्लीबोळात शिरले होते. लाकडाची पारंपरिक घरे वाहून गेली होती. नवीन घराचा पायाही उद्ध्वस्त झालेला होता. नदीच्या लाटांनी ढिगाऱ्यांसोबत बोट, गाड्या, खांब वाहून नेले होते. त्यामुळे येथील सामाजिक व्यवस्था नष्ट झाली होती. आजही रिकामे जमिनीचे तुकडे शहराच्या मधोमध दिसून येतात.
आता दुकाने, रेस्तराँ सुरू झाले आहेत. एक मीटर पाण्यात बुडालेले रेल्वेस्थानक आता सुरू झाले आहे. येथे डोंगराच्या तलहटीमधील साइको मंदिर शहराचे श्रद्धास्थान आहे. संपूर्ण शहर वाहून गेले होते. ढिगारा मंदिरासोबत डोंगराच्या चारही बाजूने गोळा झाला होता. इमारतींचे ढिगारे मंदिराच्या छतावर जमलेले होते. सर्वकाही नष्ट झाले तरी मंदिर जशास तसे आहे हा चमत्कार आहे, असे मंदिराचे मुख्य भिक्खू नोबुआ हिगूची यांनी सांगितले. अापत्तीच्या आधी येथील शेकडो लोक परस्परांना आेळखत. हिगूची यांना समुदाय पुन्हा उभा राहील अशी अपेक्षा आहे.
मिनामिसानरिकू शहर नकाशावरूननष्ट, उंच ठिकाणी वसवले जातेय
जपानच्या ईशान्येकडील सनरिकू किनाऱ्यावर हिमयुक्त वारे वाहू लागले आहेत. येथे १० वर्षांपूर्वी इतिहासातील चौथी सर्वात शक्तिशाली सुनामी अजूनही अनुभवता येऊ शकते. येथून सुमारे ८५ किमी अंतरावरील आेशिका बेटावर आजच्या दिवशी ९ रिश्टर क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. त्यानंतर सुनामी धडकली. ताशी ७०० किमी वेगाने आलेल्या लाटांनी मार्गात आलेल्या प्रत्येक गोष्टीला गिळंकृत केले. या लाटांनी सनरिकू किनारी वसलेल्या मिनामिसानरिकू शहराला जपानच्या नकाशावरून होत्याचे नव्हते केले. खरे तर या शहराने १०० वर्षांत चारपेक्षा जास्त भूकंप पाहिले होते. प्रत्येक तडाख्यानंतरही हे शहर पुन्हा उभे राहिले. मात्र आता हे शहर कधीही वसवले जाणार नाही. कारण, नैसर्गिक रचना पाहता कायम संकट राहणार आहे. सुमारे १२०६ लोक सुनामीत मृत्युमुखी पडले होते. सुनामीचे साक्षीदार चोको हागा म्हणाले, माझे घर शहरातील मध्यवर्ती भागातील रुग्णालय परिसरात होते, परंतु सुनामी थांबल्यानंतर परतलो तेव्हा घराचा केवळ पाया शिल्लक राहिलेला होता. म्हणूनच आता नव्या घराच्या उद्यानात स्मृती म्हणून जुन्या घराचा पायाचा काही भाग सांभाळून ठेवला आहे. आता शहराच्या दुसऱ्या भागात उंच ठिकाणी शहर वसवले जात आहे. तेथे सुनामीचा कमीत कमी धोका असेल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे तीन वर्षांत आधी एक कृत्रिम किनारपट्टी सुरू करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागात रुग्णालय उद्ध्वस्त झाले होते. त्याची जागा ३५०० कोटी रुपये खर्चून नवे रुग्णालय उभे राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.