आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Group Model Positive Patient Identification, 3 Israeli Scientists Discover Smart Methods, 12 Pool Testing Since October

कोरोना चाचणी:समूह नमुन्याने पॉझिटिव्ह रुग्णाची ओळख, इस्त्रायलच्या 3 शास्त्रज्ञांनी शोधली स्मार्ट पद्धती, ऑक्टोबरपासून 12 पूल टेस्टिंग

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
संशोधक (उजवीकडून) अँजेल पोर्गडोअर, मध्यभागी डॉ. शेंटल व टोमर

डेव्हिड एम. हाल्बफिन्गर
इस्त्रायलच्या तीन शास्त्रज्ञांनी कोरोना चाचणीची स्मार्ट पद्धती शोधून काढली आहे, जी नेहमीच्या पद्धतीपेक्षा जास्त वेगवान आणि प्रभावी ठरत आहे. यात समूहातील एखाद्या व्यक्तीची चाचणी करून इतरांनाही संसर्ग झाला आहे किंवा नाही हे जाणून घेता येईल. या पद्धतीला इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालयातील चाचणीसाठी मान्यता दिली आहे.

ऑक्टोबरपासून देशातील १२ प्रयोगशाळेत ही पद्धती सुरू करण्याची सरकारची तयारी आहे. कारण संसर्गाची पुढची लाट इन्फ्लूएंझासह आणखी धोकादायक ठरू शकते. इस्त्रायल ओपन युनिव्हर्सिटीच्या डॉ. नाओम शेंटल आणि त्यांचे सहकारी डॉ. टोमर हर्ट््झ, अँजेल पोर्गडोअर यांनी हे तंत्रज्ञान शोधले आहे. या तंत्राला सार्स-कोविड २ टेस्टिंग नाव देण्यात आले आहे. यासाठी ३८४ जणांचे ४८ समूह तयार करण्यात आले आहे. प्रत्येक समूहातील एका व्यक्तीची चाचणी केली जाईल. यात ज्या समूहातील व्यक्ती बाधित असेल त्या समूहातील सर्वांना पॉझिटिव्ह मानले जाईल. यामुळे चाचणीचा अहवालही लवकर मिळेल. अमेरिकी तज्ञांनीही या तंत्राचे कौतुक केले असून चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोनासंबंधी विविध प्रकारचे संशोधनाला वेग आला आहे. त्यातही लसीसाठी प्रयत्न सुरू आहेत.

युरोपमध्ये रुग्ण वाढले, मात्र पुढची लाट कमी घातक
युरोपमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गात वाढ होत आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीनुसार, पुढची लाट कमी घातक असेल. वृद्धांच्या जास्तीत जास्त चाचण्या केल्याने बाधितांचा संसर्ग दर सध्या बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आहे.

केंब्रिज युनिव्हर्सिटीतील पब्लिक हेल्थचे प्राध्यापक जॉन फोर्ड सांगतात, लोक आता आधीपेक्षा जास्त जागरूक आहेत त्यामुळे दुसऱ्या लाटेचा जास्त परिणाम होणार नाही. लंडनमधील इम्पेरियल कॉलेजचे प्रा. ग्रॅहम कुक सांगतात, नवे रुग्ण आणि मृत्यूंच्या आकडेवारीत आधीपासून अंतर आहे. संसर्ग वाढल्यानंतरही आता मृत्युदर बराच कमी राहील.