आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडिया:3.5 लाख शिक्षकांचे गट विद्यार्थ्यांना फेक न्यूजपासून बचाव शिकवतात; मोफत अभ्यासक्रम सुरू

टिफनी स्यू21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलोरॅडो स्प्रिंग्ज, कोलोरॅडो येथील पाल्मर हायस्कूलमधील इतिहासाच्या वर्गात विद्यार्थ्यांना अमेरिकन क्रांती व संसदीय कामकाज शिकवताना चुकीच्या माहितीपासून सावध कसे राहायचे हेही शिकवले जाते. मतदानाचे वय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना खोट्या बातम्या, एकतर्फी माहिती व मते कशी ओळखायची हे शिकवले जाते. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला दोन आठवडे अशी सत्रे घेतली जातात. दस्तऐवजाचे मूळ शोधण्याच्या युक्त्या ते शिकतात. टिकटॉक सेलिब्रिटी व यूट्यूब व्हिडिओंच्या दाव्यांवर बारीक नजर ठेवण्यासाठी प्रशिक्षण घेतात.

खोट्या माहितीमुळे बालके व किशोरवयीन मुलेच प्रभावित होत नाहीत. अनेक अध्ययनांत आढळले की, ज्येष्ठांना खोट्या बातम्या ओळखणे अधिक कठीण जाते. तरुणाई जास्त वेळ ऑनलाइन असल्याने शिक्षक त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाते की, व्हायरल झाल्यामुळे माहितीला वैधता मिळत नाही, कंटेंट बनावट असू शकतो व .org डोमेन वेबसाइट विश्वासार्ह बनवत नाही. ऑनलाइन खोट्या माहितीच्या महापुराच्या चिंतेत गणित, सामाजिक अभ्यास व इतर विषयांच्या ३,५०,००० शिक्षकांच्या शैक्षणिक गटांनी एक समूह केला. मोहिमेची सुरुवात करणाऱ्या नॅशनल मीडिया लिटरसी एज्युकेशन असोसिएशनने सांगितले की, पाच वर्षांत त्यांची सदस्यसंख्या दुप्पट झाली आहे.

मुलांना खोट्या बातम्यांबद्दल सावध करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. ट्विटर आणि गुगलने वापरकर्त्यांना खोटी माहिती देण्याच्या सामान्य मार्गांबद्दल इशारा देण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासक्रम चालवले जातात. न्यूज लिटरसी प्रोजेक्ट ही स्वयंसेवी संस्था म्हणते की, २०१८ ते २०२२ दरम्यान मोफत चेकोलॉजी अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २४८% वाढ झाली आहे. त्यांनी शिक्षकांना खोटी व दिशाभूल करणाऱ्या निवडणूक प्रचाराबाबत माहिती देणारा फ्लिप व्हिडिओ प्लॅटफॉर्म नुकताच आणला. अनेक खासदार व आमदारांनी सरकारी शाळांतील माध्यम साक्षरतेच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

विद्यार्थी पालकांशी ऑनलाइन माहितीवर चर्चा करण्यास बिचकतात. शिक्षणतज्ज्ञ ग्रेसी गिलिगन यांनी या वर्षी मेरीलँडच्या छोट्या शहरात एक अध्ययन केले. त्यांना आढळले की, त्यांच्या शाळेच्या जिल्ह्यातील ४७% विद्यार्थी त्यांच्या पालकांशी माध्यम स्रोतांच्या विश्वासार्हतेबद्दल फारसे बोलत नाहीत.

निम्म्याहून अधिक तरुणांनी खोट्या बातम्या खऱ्या मानून शेअर केल्या गतवर्षी प्रकाशित अध्ययनात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी ३४४६ हायस्कूल विद्यार्थ्यांना विविध कंटेंटचे मूल्यांकन करण्यास सांगितले, पण त्यांना तसे करता आले नाही. उदा. एका वेबसाइटने हवामान विज्ञानाबद्दल तथ्ये प्रदान करण्याचा दावा केला, परंतु तो जीवाश्म इंधन उद्योगापुरता मर्यादित राहिला. त्याने ९७% विद्यार्थ्यांना चकवा दिला. या अध्ययनात सुचवण्यात आले की, मुलांना मूळ संकेतस्थळाव्यतिरिक्त तथ्ये जाणून घेण्यास शिकवले पाहिजे. एका जागतिक अध्ययनात आढळले की, अर्ध्याहून अधिक तरुण चुकीची माहिती योग्य म्हणून शेअर करतात, तर ३३ टक्के लोकांनी भावनावेगाने तसे केले. पॉलिमर मीडिया इन्स्टिट्यूटच्या संशोधनानुसार, व्यग्र असल्यामुळे माहितीची पडताळणी करू शकलो नसल्याचे अनेकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...