आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • China's Population Growth Formula; Freedom For Virgins To Become Mothers Through IVF, Mandatory To Marry Local Boys Only

दिव्य मराठी विशेष:चीनचे लोकसंख्या वाढीचे सूत्र; कुमारिकांना आयव्हीएफद्वारे माता बनण्याचे स्वातंत्र्य

वाॅॅशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या जिलिन राज्याने अविवाहित मुलींना आयव्हीएफ तंत्राद्वारे (इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन) मुलांना जन्म देण्याचे स्वातंत्र्य दिले. हेबेईत काही महिलांची नियुक्ती इतर महिलांवर अधिक मुले होण्यासाठी दबाव आणण्यासाठी करण्यात आली. हुनान राज्यात एका जिल्ह्यात ‘ऑपरेशन बेड वॉर्मिंग’ सुरू हाेईल. त्यात मुलींना शिक्षण किंवा नोकरीसाठी मोठ्या शहरात जाण्याचे स्वातंत्र्य नसेल.त्यांना स्थानिक मुलांशीच लग्न करावे लागेल. समर्थक म्हणतात, विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय नाही. ती समाज विकासाची भावी पिढीची जबाबदारी आहे. राष्ट्रीय स्तरावर २ मुलांचे धोरण २०१५ पासून आहे. २०२१ पासून तीन अपत्य धोरण लागू झाले. वृद्धत्वाकडे झुकणारी सरासरी लाेकसंख्या आता चीन पुन्हा तरुण पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करत आहे. पण नवीन पिढी जास्त मुले हाेऊ देण्यास तयार नाही. यासाठी चीनमधील विविध राज्ये, जिल्हे, शहरांनी वेगळे व विचित्र नियम-कायदे केले. सुविधाही दिल्या.

गांशु राज्याने जोडप्याला तीन वर्षांपर्यंत तिसऱ्या अपत्यासाठी दरमहा १.२५ लाख रुपये व दुसऱ्या अपत्यासाठी निम्मे म्हणजे ६० हजार रुपये देण्याची घाेषणा केली. काही शहरांनी मुलांसाठी मोफत सरकारी केंद्रांची व्यवस्था केली. तर काहींनी ३ मुले असल्यास घरभाड्यात १५% सवलत दिली. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे वांग फेंग म्हणतात, चीन काहीही करू शकतो, पण घटता जन्मदर राेखू शकत नाही. लोक शिक्षित झाले, शहरी लोकसंख्या वाढली. त्यामुळे महिलांना जास्त मुले नकाेत. दक्षिण कोरिया, जपानचीही हीच स्थिती आहे. लोकसंख्या वाढवण्यात त्यांनाही यश आले नाही. बीजिंग-शांघाय सारख्या शहरांनी प्रसूती रजा १ महिन्याने वाढवली. कंपन्यांना पालकत्व रजा वाढवण्यास सांगितले. चीनमध्ये अमांडाचे नुकतेच लग्न झाले. ती एका अहवालाचा हवाला देत म्हणते, मूल वाढवण्यासाठी सरासरी ५० लाख रुपये खर्च येतो. मोठ्या शहरांत त्यापेक्षाही जास्त. गांशू राज्याप्रमाणे दरमहा १.२५ लाख रुपये अनुदान द्यावे, तरच ती जास्त मुलांचा विचार करेल.

१९८० ते २०१५ या काळात एक अपत्य धोरणामुळे लोकसंख्या घटल्याची चिंता १९८० ते २०१५ या कालावधीत एक मूल धोरणामुळे चीनच्या लोकसंख्येचे सरासरी वय वाढले. गेल्या वर्षी देशात १६ दशलक्ष मुलांचा जन्म झाला, जो तेथील मृत्यूदराइतका आहे. पुढील वर्षापासून लोकसंख्या कमी होईल, अशी भीती चीनला वाटते. आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. चीनमध्ये सध्या प्रति महिला प्रजनन दर १.३ इतकाच आहे.

बातम्या आणखी आहेत...