आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Gun Control Bill Blocked By Governor Who Received 472 Crore In Lobby Donations, Rump Supporter Gov. Youngkin

अॅना‍िलसिस:लॉबीकडून 472 कोटी देणगी घेणाऱ्या गव्हर्नरने रोखले होते गन कंट्रोल विधेयक, रम्प समर्थक आहेत गव्हर्नर यंगकिन

न्यूयॉर्क / मोहंमद अली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गन कल्चरमुळे अमेरिका पुन्हा रक्तरंजित झाला आहे. व्हर्जिनियाच्या चेसेपीकमध्ये झालेली मास शूटिंग १० दिवसांत झालेली अशी दुसरी घटना आहे. १४ नोव्हेंबरला व्हर्जिनिया विद्यापीठात मास श्ूटिंगमध्ये ३ फुटबॉलपटू ठार झाले होते. व्हर्जिनियात गन कंट्रोलवर वचक नाही. याचे कारण येथील ट्रम्प समर्थक गव्हर्नर ग्लेन यंगकिन आहेत. त्यांनी मार्च २०२२ मध्ये गन कंट्रोल विधेयक व्हेटो लावून रद्द केले होते. अमेरिकेतील सर्वात ताकदवान लॉबी नॅशनल रायफल असोसिएशनचे (एनआरए) सदस्य यंगकिन यांना २०२१ च्या निवडणुकीत एनआरएकडून जवळपास ४७२ कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. व्हर्जीनिया विद्यापीठातील घटनेनंतरही यंगकिन यांचे म्हणणे होते, आमच्या राज्यात गन कंट्रोल विधेयकाची गरज नाही.

गव्हर्नरचा नारा- माझ्याकडे गन असणे अभिमानाची बाब, तुमच्याकडेही असावी नव्या गन कंट्रोल विधेयकात शस्त्रांच्या विक्रीपूर्वी खरेदीदाराच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या चौकशीच्या तरतुदीविरोधात यंगकिन यांनी व्हिटो लावला होता. त्यांचे म्हणणे आहे की, स्वत:ची सुरक्षा करणे हा सर्वांचा अधिकार आहे.

यावर्षी मास शूटिंगच्या ६०६ घटना अमेरिकेत यावर्षी मास शूटिंगच्या ६०६, या महिन्यात ३१ घटना घडल्या. गन व्हॉयलेन्स आर्काइव्हनुसार, यापैकी २० घटनांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. कॅनडात कंट्रोल : २२ ऑक्टोबर २०२२ पासून सर्व प्रकारच्या हँडगनची विक्री, खरेदी हस्तांतरणावर बंदी आहे.

गव्हर्नरचा नारा : माझ्याकडे गन असणे अभिमानाची बाब, तुमच्याकडेही असावी व्हर्जिनियाचे गव्हर्नर यंगकिन यांचा नारा आहे, ‘माझ्याकडे गन असणे अभिमानाची बाब आहे... तुमच्याकडेही असली पाहिजे.’

बातम्या आणखी आहेत...