आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Habits Are Less, Mental Problems Are More, Drugs Are Also The Cause, Behavior Can Be Changed Through Small Efforts

अनावश्यक खरेदी:सवय कमी, मानसिक समस्या जास्त, औषधेही ठरतात कारणीभूत, छोट्या-छोट्या प्रयत्नांतून बदलू शकते वर्तन

वाॅशिंग्टन4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरज नसताना खरेदी करणे ही सर्वसाधारणपणे काही लोकांची सवय मानली जाते, परंतु ही सवय त्यांच्या छंदापेक्षा मानसिक समस्या अधिक असते. वास्तविक मेंदू एक प्रकारचे डोपामाइन संप्रेरक सोडतो, जे खरेदी करण्यास प्रवृत्त करते. काही वेळा पार्किन्सन्सच्या औषधांसारख्या दुसऱ्या रोगांवरील उपचारांसाठी घेतलेल्या औषधांमुळे देखील डोपामाइन सोडले जाते. ही औषधेच खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करतात. अमेरिकेत हार्वर्डमधील मेंदूविकारतज्ज्ञ अॅन क्रिस्टीन दुहाईम यांनी त्यांच्या ‘माइंडिंग क्लायमेट: हाऊ न्यूरोसायन्स हेल्व्ह अवर एन्व्हायर्नमेंटल क्रायसिस’ या पुस्तकात म्हटले आहे की, विनाकारण खरेदीचे दुसरे कारण हे पालनपाेषण आहे. एखादी व्यक्ती कोणत्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहे.

लहानपणी खरेदीचे काेणते स्वरूप त्याने पाहिले आहे, यावर ही सवय ठरते. एखाद्याने लहानपणापासून वारंवार ऐकले असेल, की जास्त खरेदी माणसाला गरीब बनवते, मग तो मोठा हाेताना कमी खर्चिक बनताे. भले त्याचे आई-वडील असे नसतीलही. पण ज्याने लहानपणी असे ऐकले असेल की जास्त खर्च करून चांगले जीवन जगता येते. तो माेठेपणी अनावश्यक खरेदी करतो. दुहाईम यांनी त्यांच्या पुस्तकात एका संशोधनाचा हवाला दिला आहे, त्यात असे म्हटले आहे की, जे तरुण सिगारेट ओढतात, जे आपली तलफ नियंत्रणात ठेवू शकत नाहीत असे आणि ज्यांचे कुटुंब जुगारी आहे, तेही गरज नसताना खरेदी करतात. मन अनावश्यक खरेदीसाठी कसे प्रवृत्त होते हे सांगण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले, तुम्ही कुठेतरी जलरंगांबद्दल वाचले आणि तुम्हाला चित्रकलेचा छंद आठवला. तुम्ही ऑनलाइन शाेधलेे. ते रंग स्वस्त वाटतात. आपण विकत घेताे. दुसऱ्या दिवशी कोणीतरी घराजवळ जलरंग विकायला येतात. तुम्हाला त्याचा दर्जा अधिक आवडताे. तुमचे मन तुम्हाला पुन्हा खरेदी करण्यास सांगते. अशाच प्रकारे मन कार्य करते.

स्वत:ला द्या आव्हान; रिवाॅर्ड‌्ससाठी खरेदी करा बंद {लगेच खरेदी थांबवू नका. असे केल्याने, त्यातून पुन्हा खरेदीस सुरुवात हाेईल. {पुरस्कारासाठी खरेदी करू नका. जसे एकावर एक माेफत अशी याेजना. {नवीन कपडे खरेदी टाळा. स्वत:ला जुने कपडे येतील हे आव्हान स्वीकारा. {आठवड्यातून एक दिवस निश्चित करा, त्या दिवशी काहीच खरेदी करू नका.

बातम्या आणखी आहेत...