आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विशेष:हुबेहूब दिसणाऱ्या अनोळखी व्यक्तींच्या सवयी; जगण्याच्या पद्धतीदेखील जगभरात सारख्याच

बार्सिलाेना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबेहूब दिसणाऱ्या लाेकांची लांबी, रुंदी, सवयी आणि स्वभाव जवळपास सारखेच असतात. भलेही ते जुळे किंवा नात्यात नसले तरीही त्यांच्यात हे साम्य दिसून येते. एवढेच काय वेगवेगळ्या देशात राहत असले तरीदेखील त्यांच्यात कमालीचे साम्य असते. स्पेनचे जाेसेफ करेरास ल्युकेमिया रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशाेधकांनी हा दावा केला आहे. हे संशाेधन सेल या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. संशाेधक डाॅ. मनाल अॅस्टेलर यांना ही बाब एका ताज्या अभ्यासातून जाणवली. हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्ती जगाच्या काेणत्याही काेपऱ्यात राहत असल्या तरीही सारख्याच असतात. त्यांच्या सवयी, जीवन जगण्याची पद्धतदेखील तंताेतंत सारखी असते. उदाहरणार्थ तुम्ही चांगले खवय्ये असल्यास जगाच्या एखाद्या काेपऱ्यातील तुमच्यासारखा दिसणाऱ्या व्यक्तीला खाण्याची प्रचंड आवड असेल. या संशाेधन प्रकल्पात ३२ जाेड्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी एका अॅडव्हान्स फेस रिकग्निशन साॅफ्टवेअरचा वापर केला. साॅफ्टवेअरच्या मदतीने हुबेहूब दिसणाऱ्या व जीन्स इतरांशी जुळणाऱ्या १६ जाेड्यांना वेगळे करण्यात आले. त्यानुसार अशा लाेकांच्या ३ हजार ७३० जीन्समध्ये १९,२७७७ समान व्हेरिएशन दिसून आले हाेते. परस्परांशी भिन्न दिसणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत या जाेड्यांच्या गुणसूत्रांमधील साम्य जास्त प्रमाणात असल्याचे नाेंदवण्यात आले. ही माहिती सामान्य स्वरूपाची वाटू शकते.

आजार, उपायांवर लाभदायी संशाेधन प्रकल्पांचा निष्कर्ष जाहीर झाल्यानंतर अॅस्टेलर म्हणाले, समान डीएनए असलेल्या लाेकांमधील आजारांची भविष्यवाणी व उपायांच्या दृष्टीने हे संशाेधन महत्त्वाचे ठरू शकेल. डीएनए व जीन्सच्या काही भागावर पर्यावरणाचादेखील परिणाम हाेत असताे.

बातम्या आणखी आहेत...