आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हॅकर्सच्या एका समूहाने अमेरिकेतील अनेक कंपन्या व संस्थांच्या सुरक्षेला सुरुंग लावला. या हॅकिंगमुळे रुग्णालये, कंपन्या, पाेलिस, तुरुंग व शाळांत लावलेल्या १.५ लाख सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची लाइव्ह फीड हॅक करण्यात आले आहे. कॅमेरा डेटा लीक झालेल्यांत टेस्ला व क्लाऊडफ्लेअरचा समावेश आहे. फुटेज क्लाऊड-बेस्ड सेक्युरिटी कॅमेरा सर्व्हिस देणाऱ्या सिलिकाॅन व्हॅलीच्या स्टार्टअप वेरकाडाच्या प्रणालीला हॅकर करून मिळवण्यात आले आहे. हॅकरने महिलांचे रुग्णालयांतील छायाचित्रे व वेरकाडाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजपर्यंत मजल मारली. त्यापैकी अनेक कॅमेरे चेहऱ्याची आेळख पटवण्यासाठी वापरले जातात.
टेस्लाच्या व्हिडिआेत शांघायमधील कर्मचारी असेंब्ली लाइनवर काम करत आहे. हॅकर म्हणाला, टेस्लामधील कारखाने, गाेदामांचे लाइव्ह फीड २२२ कॅमेऱ्यांच्या मदतीने आमच्या ताब्यात आहे. मॅसेच्युसेट्स व स्टग्टन पाेलिसांनी गुन्हेगारांची केलेल्या चाैकशीचे फुटेजही हॅकर्सने हस्तगत केले आहे. हॅकिंगमध्ये सामाली हॅकर टिली काेट्टमन म्हणाला, आंतरराष्ट्रीय हॅकिंगच्या एका गटाने ही हॅकिंग केली आहे. किती माेठ्या प्रमाणात कॅमेऱ्याद्वारे निगराणी केली जात आहे, असा हॅकिंगमागील उद्देश आहे. खरे तर या प्रणालीला सुरुंग लावणे किती साेपे काम आहे, हे आम्हाला सांगायचे आहे.
या हॅकरच्या गटाने इंटेल व निसान कंपनीचा डेटाही हॅक केला आहे. टिलीच्या म्हणण्यानुसार, सुपर अॅडमिन अकाउंटद्वारे वेरकाडापर्यंत पाेहाेचलाे. तेथून सर्व ग्राहकांच्या कॅमेऱ्यापर्यंत पाेहाेचता आले. त्यासाठी इंटरनेटवर सार्वजनिक रूपाने अॅडमिन अकाउंटसाठी एक युजरनेम व पासवर्ड मिळाला हाेता.
चीनचे उपकरण भारताच्या सायबर सुरक्षेसाठी धाेकादायक
भारतासाठी चीन सर्वात माेठा धाेका आहे. सीसीटीव्ही, माेबाइल व टीव्ही इंटरनेटने कनेक्ट प्रत्येक गाेष्टीचा डेटा चीनकडे पाेहाेचवताे. म्हणजे आपण पाहत असलेले स्क्रीन चीनही पाहू शकते. देशातील बहुतांश तंत्रज्ञान चीनमध्ये बनलेले आहे. एसी, टीव्ही, कारही नेट आधारित आहे. त्यामुळे हॅकिंगची संधी जास्त आहे. चिनी हार्डवेअरचा वापर टाळला पाहिजे. युराेपसारख्या देशात सीसीटीव्हीमध्ये डेटा इन्क्रिप्टेड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. इस्रायल, अमेरिकेप्रमाणेच देशाला सेक्युरिटी सिस्टिम बनवावी लागेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.