आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Hackers Steal Corona's Research Data, Extort Millions In Ransom, Threaten Organizations By Sending 10 Lakh Emails

दिव्य मराठी विशेष:कोरोनाचा रिसर्च डेटा चोरून कोटींची खंडणी वसूल करतात हॅकर्स, 10 लाख ईमेल पाठवून संस्थांना धमकी

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • महामारीतही काळा धंदा ; अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटलीत सायबर हल्ले

कोरोनावरील संशोधनाचा डेटा चोरी करून हॅकर्स ५ कोटींपासून ते २३ कोटींपर्यंत खंडणी वसूल करत आहेत. सायबर रिसर्चर संस्था प्रूफप्वाइंटनुसार, गेल्या महिन्यात हॅकर्सने अशा खंडणीसाठी अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस व इटलीसह अनेक देशांमधील विविध संस्थांना सुमारे १० लाख ईमेल पाठवले. हॅकर्स समूह नेटवॉकरने अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील कॉम्प्युटरवर सायबर हल्ला केला. सॅनफ्रान्सिस्कोमध्ये या कॉम्प्युटरवर वैद्यकीय पथक कोरोना संबंंधित संशोधन करत होते. हॅकर्सनी विद्यापीठाच्या कॉम्प्युटरवर मालवेअर टाकले. नंतर डार्कवेबद्वारे खंडणी मागितली. डार्कवेबवर असलेल्या हॅकरचे पेज इतर वेबसाइटप्रमाणेच दिसते. यावर एकीकडे प्रश्न विचारलेले असतात, तर दुसरीकडे सॉफ्टवेअरच्या फ्री सॅम्पलची ऑफर आणि लाइव्ह चॅटची सुविधा असते. तसेच काउंटडाऊन टायमरही असते. जसजसा वेळ कमी होत जातो तसतसे हॅकर्स खंडणीची रक्कम दुप्पट करतात. नंतर मालवेअरद्वारे एकत्रित केलेला डेटा नष्ट करतात. दरम्यान, हॅकर्सने विद्यापीठाला मेसेज पाठवून लॉग इनची पद्धत सांगितली. तसेच ईमेलद्वारे कॉम्प्युटर स्क्रीनवरील नोटद्वारे लॉग इन करण्यास सांगितले जाते. सुमारे ६ तासांनंतर विद्यापीठाने खंडणीची रक्कम देण्यासाठी हॅकर्सकडे अधिक वेळ मागितला. हॅकर्सने विद्यापीठाकडे २३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. विद्यापीठाने सांगितले, कोरोना संकटामुळे आर्थिक स्थिती नसल्याने केवळ ६ कोटी रुपये देऊ शकतो. मात्र हॅकर्स १२ कोटींपेक्षा कमी रक्कम घेण्यास तयार नव्हते. शेवटी ९ कोटी रुपये निश्चित झाले.

अमेरिकी, युरोपीय तपास संस्थांकडून सावध राहण्याच्या सूचना

एफबीआय, युरोपोल आणि ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने रिसर्च टीमला हॅकर्सपासून सावध राहण्यास सांगितले आहे. तसेच डिजिटल खंडणीबद्दल तत्काळ माहिती देण्यास सांगितले. सायबर सिक्युरिटी कंपनी एमसीसॉफ्टमध्ये थ्रेट अॅनालिस्ट ब्रेट कॅलो सांगतात, हॅकर्ससमोर संस्थांकडे जास्त पर्याय नसतात. तसेच खंडणी दिल्यानंतरही हॅकर्स डेटा नष्ट करतीलच याबाबत खात्री नसते.

0