आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hair Donation Campaign To Absorb The Oil Spilled In The Seas Of Mauritius, Because One Kilogram Of Hair Absorbs Eight Liters Of Oil

दिव्य मराठी विशेष:मॉरिशसच्या समुद्रात पसरलेले तेल शोषण्यासाठी केशदान अभियान, कारण एक किलो केस शोषतात आठ लिटर तेल

पोर्ट लुईसएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जहाजातून झाली होती 1000 टन तेलगळती, आता समुद्राचे सौंदर्य वाचवण्याचा प्रयत्न
  • समुद्रामधील जैवसंपदा वाचवण्यासाठी मोहीम

हिंदी महासागरातील सर्वात सुंदर बीचेससाठी प्रसिद्ध मॉरिशस सध्या गंभीर पर्यावरण संकटाला तोंड देत आहे. येथे २५ जुलैला तेलाने भरलेले जपानचे एक जहाज तुटले होते. सुमारे १ हजार टन तेलगळती होऊन समुद्रावर तवंग पसरला होता. यामुळे येथील बीचेस काळवंडून तेलकट झाली आहेत. मॉरिशसच्या १३ लाखांच्या लोकसंख्येत ५०% हिंदू आहेत. पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी पर्यावरणीय आणीबाणी लागू केली आहे. समुद्राचे सौंदर्य व पर्यटन हेच या देशाच्या उत्पन्नाचे प्रमुख स्रोत आहेत. यामुळे ते टिकवण्यासाठी लोक आपले केस दान करत आहेत. सलूनही त्यांच्याकडून शुल्क घेत नाही आहेत. तेल शोषण्यासाठी हे केस ज्यूटच्या पोत्यांत भरून समुद्रात टाकले आहेत. टास्क फोर्स रोज समुद्राची सफाई करत आहे. यात फ्रान्स व जपानच्या सागरी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. तेलगळतीचे स्थान ब्लू बे मरीन पार्क रिझर्व्ह आणि आयलँडजवळ आहे. यामुळे पार्कमधील सागरी जीवजंतू आणि वन्यसंपदेच्या अनेक प्रजातींना धोका आहे. या परिसरात अनेक बीचेसवर मोठ्या संख्येने पर्यटकांचा राबता असतो. मॉरिशसच्या खासदार जोन्ना बेरेंगर म्हणाल्या, ‘आमचे कार्यकर्ते उसाची चिपाडे आणि केसांनी भरलेली पोती अंथरूण समुद्रातील तेल शाेषून घेत आहेत. केस हे तेलाचा तवंग रोखण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. १ किलो केस सुमारे ८ लिटर तेल शोषून घेतात. यामुळे लोकांनी जास्तीत जास्त केस दान करावेत, यासाठी आम्ही एक मोहीम राबवली आहे. तेलाच्या स्वच्छतेसाठी ४०० सी बूमलाही तैनात केले आहेत. यासोबतच हजारो स्वयंसेवक या कामात मदत करत आहेत.’

सागरी जैववैविध्य आणि पर्यटन हाच उत्पन्नाचा स्रोत

मॉरिशसचे पर्यावरणमंत्री के.व्ही. रमनाओ म्हणाले, गतवर्षी पर्यटनातून आम्ही ६३ अब्ज रुपये कमावले होते. आम्हाला ही जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य कोणत्याही स्थितीत वाचवावेच लागेल.

बातम्या आणखी आहेत...