आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:हैतीला फ्रान्स कंपन्यांनी केले बरबाद, याच  पैशातून उभारला होता प्रसिद्ध आयफेल टॉवर

फ्रान्सएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्सचा आयफेल टॉवर आणि अमेरिकेचा सिटी ग्रुप हे त्यांच्या स्वत:च्या मेहनतीचे फळ नसून कॅरिबियन समुद्रातील हैतीच्या शोषणाचे पुरावे आहेत. फ्रान्स आणि अमेरिकेने पर्यायाने हैतीचे आर्थिक शोषण करून आपली समृद्धी वाढवल्याचे सिद्ध करणारी कागदपत्रे समोर आली आहेत. हैती हा फ्रान्सचा गुलाम होता. फ्रेंच लोक इथल्या उसाच्या शेतात कृष्णवर्णियांना गुलाम करून नफा कमवत असत. १८०४ मध्ये जेव्हा हैतीच्या नागरिकांनी स्वातंत्र्यासाठी उठाव केला आणि नेपोलियनच्या सैन्याचा पराभव केला तेव्हा त्याला सशर्त स्वातंत्र्य मिळाले. २५ सप्टेंबर १८८० रोजी हैतीला १.५ लाख कोटी रुपये देण्यास सांगण्यात आले. हे कर्ज चुकवताना हैती कंगाल झाला. या पैशातून फ्रान्सची भरभराट झाली आणि आयफेल टॉवर उभारला गेला. हैती कर्जातून सावरतो तितक्यात फ्रान्सने तेथे राष्ट्रीय बँकेची उभारणी केली. तिथल्याच लोकांकडून पैसे जमा करून त्यांनाच कर्ज द्यायला सुरुवात केली. यामुळे हैती अजून कंगाल झाला. त्याला कंगाल बनवण्यात अमेरिकेचीही भूमिका होती. सिटी ग्रुप हैतीच्याच पैशाने उभा राहिला.

नॅशनल बँक हैती सरकारकडून प्रत्येक व्यवहारावर घ्यायची शुल्क
हैतीमध्ये ज्या क्रेडिट इंडस्ट्रियलने नॅशनल बँक बनवली होती, ती हैती सरकारकडून प्रत्येक व्यवहारावर शुल्क घेते. फ्रान्सच्या भागधारकांनी इतका पैसा कमावला की, तो नफा हैती सरकारच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त झाला. अशाच परिस्थितीत हैतीने हिंसक गँगही बनवल्या.

बातम्या आणखी आहेत...