आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Haji Will Be Given A Robot, Holy Ab e Jamjam Nanotechnology Will Stop The Spread Of The Virus, News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​रोबोट देणार हाजींना पवित्र आब-ए-जमजम, नॅनो टेक्नॉलॉजीयुक्त वस्त्रे व्हायरसचा प्रसार रोखणार, अॅपद्वारे यात्रेवरही असेल देखरेख

दुबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे हायटेक हज यात्रा; आजवर 5.4 लाख अर्ज मिळाले, 60 हजारच मंजूर होणार

सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी जाणाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक नोंदणीचा अंतिम टप्पा सुरू आहे. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी विदेशी यात्रेकरूंना हजची परवानगी देण्यात आली नाही. हजची संभाव्य तारीख १७ ते २२ जुलै ठेवण्यात आली आहे. या वर्षी लस घेतलेल्या १८ ते ६५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीच हज यात्रा करू शकतील. जास्तीत जास्त ६० हजार लोकांनाच परवानगी मिळेल. हज आणि उमरा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आजवर ५.४ लाख अर्ज मिळाले आहेत. या वेळी हजच्या आयोजनातील अनेक बाबी हायटेक असतील.

हायटेक वस्त्रे
हजसाठी यंदा नॅनो टेक्नोलॉजीने निर्मित वस्त्रे असतील. हज आणि उमरादरम्यान पुरुषांसाठीच्या टू पीस पेहरावाला एहराम म्हटले जाते. नवीन पेहराव व्हायरस आणि बॅक्टेरियाला रोखू शकतो. कोरोना संसर्ग लक्षात घेऊन यावर्षी एहरामचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. तो १००% कॉटनपासून बनवलेला आहे. तो ९० हून अधिक वेळा धुतला जाऊ शकतो. तो सौदीचे मानक, मेटरोलॉजी आणि गुणवत्ता संघटनेकडून मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय महिलांना प्रथमच पुरुष भाविकांशिवाय हजची परवानगी देण्यात आली आहे. ज्या महिला एकट्या हजसाठी नोंदणी करतील त्या यात्रेदरम्यान गठित महिला लीगचा भाग असतील. यामुळे त्यांची सुरक्षा निश्चित होईल.

स्मार्ट कार्ड आणि परमिटशिवाय यात्रा नाही
कोणतेही स्मार्ट कार्ड आणि अधिकृत परमिटशिवाय हज करता येणार नाही. हज आणि उमराचे उपमंत्री डॉ. अब्दुलफत्ताह मशात यांनी म्हटले की, परमिटचे इलेक्ट्रॉनिक कार्ड आणि तीर्थयात्रेचा आयडी पडताळून पाहिला जाईल.

पूर्ण व्यवस्था अॅपद्वारे
यात्रेकरूंच्या परतीची सर्व प्रक्रिया डिजिटलाइज केली आहे. सुरक्षेसाठी बुक केलेल्या स्लॉटद्वारे ग्रँड मशिदीत जाणाऱ्या गर्दीचे नियोजन आणि यात्रेकरूंच्या गरजांसाठी अॅप लाँच करण्यात आले आहे. इटमरना अॅप्लिकेशनद्वारे यात्रेकरूंच्या आरोग्याची स्थिती कळेल.

फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात अत्याधुनिक रोबोट करतील मदत
मक्केत फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रोबोट तैनात केले आहेत. अलमारीवजा रोबोटमध्ये पवित्र जलाच्या बाटल्या भरलेल्या असतील. त्यामुळे लोकांना जवळ न जाताही पवित्र जल मिळेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रोबोटद्वारे मानवी संपर्काशिवाय सेवा दिल्या जातील. वर्षानुवर्षे हज यात्रेकरू आब-ए-जमजम (जमजमचे पवित्र जल) पिण्यासाठी येतात. याला इस्लामी परंपरेत चमत्कारी मानले जाते.

बातम्या आणखी आहेत...