आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Halima, The First Model To Wear Hijab, Left The World Of Fashion, Taking A Decision Based On Religious Beliefs

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिका:हिजाब घालणारी पहिली माॅडेल हलीमाने फॅशनचे जग सोडले,धार्मिक श्रद्धांमुळे घेतला निर्णय

न्यूयॉर्क2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 23 वर्षीय हलिमाने जगातील नामवंत फॅशन नियतकालिकांत मुखपृष्ठावर स्थान मिळवले होते

अमेरिकेतील प्रसिद्ध मॉडेल हलीमा अॅदेनने फॅशनचे जग साेडण्याचा निर्णय घेतला आहे. धार्मिक श्रद्धेपुढे हा व्यवसाय सुरू ठेवणे अडचणीचे ठरत हाेते. २३ वर्षीय हलिमाने जगातील नामवंत फॅशन नियतकालिकांत मुखपृष्ठावर स्थान मिळवले होते. तिला हिजाब वापरणारी पहिली महिला मॉडेल म्हणून ओळखले जाते.

समाज माध्यमावर तिने म्हटले, हिजाबी असणे प्रत्यक्षात खूप खडतर प्रवास आहे. कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या साथरोगामुळे मुस्लिम महिला असल्याने तिच्या काय श्रद्धा आहेत, यावर विचार करण्याची मला संधी मिळाली. कोविड- १९ मुळे तिला ग्लॅमरच्या जगापासून विभक्त होण्याची संधी मिळाली. हिजाब वापरण्यात मी काेणती चूक केली, याचीही मला जाणीव झाली.

धार्मिक श्रद्धांच्या विरोधात मॉडेलिंग करण्याबाबत बोलताना तिने सांगितले, मी जोखमीपेक्षा जास्त संधींचा विचार केला, यास मी स्वत: जबाबदार आहे. तेव्हा मी चूक केली होती. आता कधीच अशी चूक करणार नाही. ही चूक मला शिकण्याची संधी मिळाली. हलिमाचा जन्म केनियाच्या निर्वासिताच्या छावणीत झाला. ती ६ वर्षांची होती असताना आईवडिल तिला सोमालियात सोडून अमेरिकेत वास्तव्यास गेले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser