आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसायन विक्रीवर बंदी:ॲमेझॉनमधून विक्री होणाऱ्या रसायनाचा आत्महत्येत वापर, अमेरिकी संसदेने विक्री रोखण्यास सांगितले

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत ॲमेझॉन आणि अन्य ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे विकलेल्या एका रसायनाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. जुलै २०१९ मध्ये एका व्यक्तीने ॲमेझॉनच्या साइटवर पोस्ट रिव्ह्यूमध्ये लिहिले की, कृपया हे उत्पादन विकणे बंद करा. माझ्या भाचीने जीव देण्यासाठी याचा वापर केला आहे. अॅमेझॉनने यावर काही करू असे सांगितले, मात्र तरीही कोणतेही पाऊल उचलले नाही. यानंतरही आत्महत्येशी संबंधित रसायन प्रिझर्व्हेटिव्हची विक्री ॲमेझॉनवर होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सने गेल्या दोन वर्षांत अशा १० लोकांची ओळख पटवली आहे, ज्यांनी साइटवरून खरेदी केलेल्या रसायनाचा वापर करून आत्महत्या केली आहे. टेक्सासच्या २७ वर्षीय तरुणाच्या आईने अॅमेझॉनविरुद्ध खटला दाखल केला आहे.

अमेरिकी संसद-काँग्रेसच्या सदस्यांनी ॲमेझॉनचे अध्यक्ष अँडी जेसिना गेल्या आठवड्यात पाठवलेल्या पत्रात सभागृहातील सदस्यांनी रसायनाच्या विक्री व संबंधित आत्महत्यांची माहिती मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...