आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना शांत करण्यासाठी मोबाइल सोपवणे नुकसानीचे:यामुळे वयाच्या 9 व्या वर्षात एकाग्रता अन् क्षमता घटते

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकदा लहान मुले जेव्हा जास्तच त्रास द्यायला लागतात किंवा रडतात तेव्हा पालक त्याला मोबाइल वा टॅब्लेट सोपवून शांत करतात. यामुळे मुल शांत होते, मात्र भविष्यात गंभीर परिणाम समोर येतात.

९ वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर अशा मुलास बाह्य समाजातील अन्य मुलांशी संपर्क साधताना जास्तीच्या स्क्रीन टाइममुळे ते मिसळू शकत नाहीत. त्यांची एकाग्रता घटते आणि काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. हार्वर्ड युनिव्हर्सिटी सेंटर ऑफ डेव्हलपमेंट चाइल्डच्या एका संशोधनानुसार, ९ वर्षे वयापर्यंत जास्त वेळ मोबाइल किंवा टॅब्लेटसोबत घालवणाऱ्या मुलांची शैक्षणिक कामगिरी घटते. यामुळे मानसिक आरोग्यही बिघडते. संशोधनातील निष्कर्षानुसार, अशा मुलांना लहानपणी मोबाइल देणे त्यांचे बालपण हिरावून घेण्यासारखे आहे. याऐवजी त्यांना मोठ्या माणसांशी चर्चा करू देणे आवश्यक आहे. याशिवाय त्यांना सामाजिक काम किंवा शारीरिक हालचाल करण्याची गरज आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होऊ शकेल. अशी मुले भावनात्मकदृष्ट्या खूप कमकुवत होतात. याचा परिणाम मुलांमध्ये जास्त होतो.

अन्य एका संशोधनानुसार, स्क्रीन टाइम वाढल्याने मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढतो आणि ते आव्हानात्मक वातावरणात अाक्रमक वर्तन करू लागतात. यामुळे मुलांची शारीरिक हालचाल कमी होते.

प्रश्नाची उत्तरे द्या, कपड्याची घडी घालायला शिकवा तुम्ही कपड्यांची घडी घालत असाल तर मुलांनाही आपल्यासोबत कपड्यांची घडी घालायला द्या. यामुळे त्याला कामात लक्ष लागेल. स्क्रीन टाइमची वेळ निश्चित करा. जास्तीत जास्त प्रश्न विचारू द्या. हवे तर त्यांना उत्तरही द्या.

बातम्या आणखी आहेत...