आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना काळादरम्यान जगभर आक्रसलेले आकाश आता मोकळे होत आहे. ऑस्ट्रेलियात सोमवारी दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली. लस घेतलेल्या नागरिकांना क्वाॅरंटाइन व्हावे लागणार नाही. लस न घेतलेल्या पर्यटकांना १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागेल. दुसरीकडे, ब्रिटनने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. अलगीकरण, विलगीकरण आणि सार्वजनिक ठिकाणी लस सक्ती रद्द केली जाईल. आपल्या नागरिकांना कोरोना लसीच्या चार मात्रा देणाऱ्या इस्रायलने मोठा निर्णय घेतला आहे. लस न घेतलेल्या पर्यटकांना इस्रायल देशात येण्यासाठी मंजुरी देईल. हे १ मार्चपासून लागू होईल. फ्रान्सने पूर्ण लसीकरणाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांना निगेटिव्ह कोरोना चाचणीची सक्ती रद्द केली आहे. जर्मनीमध्येही २० मार्चनंतर कोराेना निर्बंध उठवले जातील.
कोरोना रुग्ण घटताहेत, मात्र अद्यापही मास्क गरजेचा
आऊटडाेअर : गर्दीच्या ठिकाणी मास्क अवश्य वापरा. एकटे पायी जात असाल व गालांवर हवेचा झोत येतोय असे वाटल्यास मास्कची गरज नाही. मात्र, बाहेर जाताना मास्क अवश्य ठेवा.
इनडोअर : सुपरमार्केट, जिम-स्पा आणि चित्रपटगृहांत मास्क अवश्य घाला. सध्या कोरोना गाइडलाइन्स लागू आहेत. इनडोअरमध्ये हवा कमी असते.
सार्वजनिक वाहतूक : बस-रेल्व किंवा कॅबमध्ये प्रवास करताना मास्क अवश्य घाला. विमान प्रवासादरम्यान मास्क आवश्यक व सक्तीचा.
शाळकरी मुले : मुलांमध्ये संसर्गाचा धोका कमी असतो. मात्र, सध्या १५ ते १८ वयाच्या मुलांना लस दिली जात आहे. अशा स्थितीत मुलांना शाळेत मास्क लावून पाठवा.
शिंक येत असल्यास : शिंक येत असल्यास घरी राहणे चांगले. गरजेनुसार मास्क लावून बाहेर जा.
कोणता मास्क वापरावा : चांगल्या गुणवत्तेचा व फिटिंगचा मास्क वापरा. केएन ९५, एन ९५, केएफ ९४ चांगले. सर्जिकल मास्कही चांगला राहतो.
मेलबर्नच्या विमानतळावर दोन वर्षांनंतर भावाला भेटून भाऊक झाली प्रियंका
मेलबर्न विमानतळावर सोमवारी अनेक भावुक भेटी दृष्टीस पडल्या. जवळपास दोन वर्षांनंतर स्वकीयांना भेटल्याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर आणि अश्रूतून व्यक्त होत होता. ५० हजारांपेक्षा जास्त ऑस्ट्रेलियाई विदेशांत अडकले होते. जगातील सर्वात लांब आणि कडक लॉकडाऊन सोसणाऱ्या मेलबर्नच्या विमानतळावर भारतातून आलेल्या सुरिंदर यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. प्रियंकाचे चुलत भाऊ सुरिंदर मेलबर्नमध्ये राहतात आणि या दोघांनी कोरोनामुळे अनेक नातेवाईक गमावले आहेत. प्रियंकाच्या कुटुंबात चुलत भाऊ सुरिंदरशिवाय कोणी नाही. भाऊ-बहीण गळाभेट घेऊन रडू लागले. यादरम्यान ऑस्ट्रेलियात सोमवारी अन्य देशांतून सुमारे ५० आंतरराष्ट्रीय विमानांची लँडिंग झाली. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने स्पष्ट केले की, भविष्यात आता कधी लॉकडाऊन लावला जाणार नाही. ऑस्ट्रेलियात दोन वर्षांपासून ठप्प पर्यटन उद्योगाचीही आशा जागली आहे. पर्यटन क्षेत्रात साडे ६ लाखांहून जास्त लोकांसाठी रोजगार मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.