आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hard line Nationalist Georgia Leads PM Race; Support In The Country Due To Opposition To Immigrants | Marathi News

निवडणूक 25 ला:कट्टर राष्ट्रवादी जॉर्जिया यांना पीएम पदाच्या शर्यतीत आघाडी ; स्थलांतरितांच्या विरोधामुळे देशात समर्थन

राेमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इटलीत नव्या पंतप्रधानांसाठी ऐतिहासिक निवडणूक हाेणार आहे. कट्टरवादी ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या जॉर्जिया मेलाेनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. चार वर्षांपूर्वी केवळ ४.१३ टक्के मते मिळवणाऱ्या मेलाेनी यांच्या पक्षाला २५ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. मेलाेनी यांच्या लाेकप्रियतेत गेल्या दाेन वर्षांत वाढ झाली आहे. जॉर्जिया मेलाेनी दहशतवाद, स्थलांतरित, एलजीजीबी हक्कांच्या कट्टर विराेधक म्हणून ओळखल्या जातात. काेराेना काळानंतर इटलीमध्ये आफ्रिका, दक्षिण अमेरिका, पश्चिम आशियातून स्थलांतरितांची घुसखाेरी इटलीतील नागरिकांच्या संतापाचे कारण मानले जाते. इतर पक्षांना या मुद्द्यावर इटलीतील जनतेचा पाठिंबा मिळवता आलेला नाही. विद्यमान पंतप्रधान मारियाे ड्रागी यांच्या सेंटर लेफ्ट डेमाेक्रॅटिक पक्षाच्या मतदारांतील पकड ढिली हाेत चालली आहे. त्यामुळे ड्रागी यांच्या राजकीय सहकाऱ्यांनी त्यांच्या सरकारपासून अंतर ठेवून वागण्यास सुरुवात केली आहे. इटलीत मुदतीच्या आधीच पंतप्रधानपदासाठी निवडणूक घेतली जात आहे.

जॉर्जिया यांचा मुसाेलिनी नायक, महिला उमेदवार ट्रम्प यांच्या समर्थक जॉर्जिया मेलाेनी इटलीचा कुख्यात हुकूमशहा बेनिताे मुसाेलिनी याला आपला आदर्श मानतात. मुसाेलिनीच्या केवळ लाेकशाहीविषयक विचारांशी मी सहमत नाही. मेलाेनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान बाेरिस जॉन्सन यांच्या समर्थक मानल्या जातात. आयएम जॉर्जिया नावाचे पुस्तक लिहिणाऱ्या जॉर्जिया सिंगल मदर आहेत. त्या बर्लुस्काेनी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री हाेत्या.

इटलीच्या निवडणुकीत महागाई माेठा मुद्दा, असंतोष वाढला
महागाईचा दर ८.२ टक्के आहे. गेल्या ३६ वर्षांत पहिल्यांदाच जास्त आहे. स्थानिकांना राेजगार दिला जाईल, असे मेलाेनी यांचे आश्वासन आहे. थेट खात्यावर पैसे पाठवू.
इस्लामी दहशतवाद : इटलीत अल-कायदाचे नेटवर्क सक्रिय आहे. आफ्रिका-पश्चिम आशियातून येणारे मुस्लिम स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्थानिकांत संताप आहे.

माफियाविराेधी पक्षाचा पाठिंबा कमी इटलीतील कुख्यात माफियांना विराेध करणारी फाइव्ह स्टार मूव्हमेंट पार्टी निवडणुकीच्या रिंगणात आहे. परंतु या पक्षाला कमी पाठिंबा मिळत आहे. परंतु याच पक्षाचे ड्रागी इटलीत आघाडी सरकारचे प्रमुख आहेत. इटलीतील निवडणुकीला यंदा वेगली कलाटणी शक्य आहे.

८५ वर्षीय बर्लुस्काेनी टिकटॉकवर
माजी पंतप्रधान ८५ वर्षीय सिल्व्हियाे बर्लुस्काेनी देखील निवडणूक मैदानात आहेत. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बर्लुस्काेनी टिकटॉकमध्ये पाेस्ट टाकू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...