आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:डोनाल्ड ट्रम्प महाभियाेगातून मुक्त होण्याची शक्यता, केवळ 5 रिपब्लिकन सिनेटरने ट्रम्प यांच्या विरोधात

वॉशिंग्टन2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी काँग्रेसचे वरिष्ठ सभागृह सिनेटने माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोग प्रक्रियेला असंविधानिक म्हणत हा प्रस्ताव मंगळवारी फेटाळला. रिपब्लिकन सदस्य रँड पॉल यांनी यासंबंधीचा प्रस्ताव सिनेटमध्ये मांडला होता. या प्रस्तावावर मतदान झाले आणि त्यास सिनेटने ५५-४५ असे फेटाळले. हा कौल लक्षात घेऊन ट्रम्प महाभियोगाच्या प्रक्रियेतून मुक्त होतील, असे संकेत मिळतात.

सिनेटमध्ये झालेल्या मतदानात रिपब्लिकन खासदार ट्रम्प यांच्या बचावासाठी एकजूट झाले होते. सिनेटमध्ये ट्रम्प यांना दोषी ठरवण्यासाठी ६७ मतांची गरज आहे. सध्या डेमोक्रॅटकडे ५० मते आहेत. त्यांना रिपब्लिकनच्या १७ खासदारांच्या मतांची गरज भासणार आहे. परंतु पॉल यांच्या प्रस्तावावर केवळ ५ रिपब्लिकन सिनेटरने ट्रम्प यांच्या विरोधात मत दिले. त्यावरून उर्वरित रिपब्लिकन खासदार ट्रम्प यांच्या बाजूने आहेत, असे संकेत मिळतात. महाभियोगाच्या प्रक्रियेतही असेच मतदान झाल्यास १२ मते कमी पडतील. ट्रम्प यांचा बचाव होईल. कॅपिटल हिलवर हिंसाचार भडकावल्याच्या आरोपाखाली ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची प्रक्रिया चालवली जात आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काही मतांची गरज भासणार आहे.

रशियन गुप्तचर संस्थेच्या मदतीने उद्योगात यशस्वी
अमेरिकेतील पत्रकार व हाऊस ऑफ बुशसारख्या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक क्रेग उंगर यांच्या नव्या पुस्तकात ट्रम्प यांच्याबद्दल अनेक सनसनाटी दावे आहेत. कोमप्रोमॅटमध्ये त्यांनी हे दावे केले. ४० वर्षांपूर्वी तरुण ट्रम्प यांना रशियाची गुप्तचर संस्था केजीबीने उद्योगासाठी मदत केली होती. १९८० व ९० च्या दशकात ट्रम्प अनेक वेळा दिवाळखोरीत निघाले. तेव्हा केजीबीने मदत केली. ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाले. तेव्हा त्यांनी पुतीन यांचे कर्ज फेडले. पुतीन यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून दिली, असा दावा या पुस्तकांतून लेखकाने केला आहे. ट्रम्प यांचा रशियाशी जेफ्री इप्सटेन यांच्यामार्फत संपर्क होता. जेफ्री हे ट्रम्प यांचे मित्र आहेत. जेफ्री हा मुली पुरवण्याचे काम करायचा असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...