आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Harry Potter Books Updates: Evaluate The Price Of Books Of Harry Potter Will Pay Rs 1 Crore; Winnie The Pooh Rs 18 Lakh; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:गोष्टींची पुस्तके बदलतील नशीब; हॅरी पॉटर 1 कोटी, विनी द पूह 18 लाख देणार; पुस्तकांच्या किमतीचे मूल्यांकन

न्यूयॉर्क13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘द हॉबिट’च्या 4 आवृत्त्या देतील 35 लाखांपेक्षा जास्त रुपये

जर तुम्हाला लहानपणी गाेष्टी वाचण्याची अावड असेल अाणि ती सर्व पुस्तके जर जपून ठेवली असतील तर ती तुमचे नशीब बदलू शकतात. ऑक्सिब्रिज होम लर्निंग या ब्रिटनधील शैक्षणिक संस्थेने अशा प्रकारच्या उत्कृष्ट पुस्तकांच्या किमतींचे मूल्यांकन केले अाहे. त्यानुसार १९९७ मध्ये प्रकाशित झालेल्या हॅरी पॉटर मालिकेतील ‘ हॅरी पाॅटर अंॅड फिलाॅसाॅफर्स स्टाेन’ या पहिल्या पुस्तकाची किंमत ९९.६७ लाख असल्याचे मूल्यांकन करण्यात अाले अाहे. विनी द पूह कलेक्शनचे पुस्तक तुम्हाला १८ लाख रुपये मिळवून देऊ शकते. त्याचबराेबर जवळपास ९० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेले द हॅबिट, द कॅट इन द हॅट पुस्तकाची मूळ प्रतही तुम्हाला मालामाल करू शकते.

द हॅबिटच्या अातापर्यंत ४ अावृत्त्या प्रकाशित झाल्या अाहेत. त्याची अमेरिकन अावृत्तीही प्रकाशित करण्यात अाली अाणि ती पण खूप प्रसिद्ध झाली हाेती. याशिवाय बिट्रिक्स पॉट : द टेल ऑफ पीटर रॅबिट (१९०१) हे पुस्तक तुम्हाला जवळपास १६ लाख रुपये मिळवून देऊ शकते. अाॅक्सिब्रिजच्या डिजिटल विभागाचे प्रमुख रिमन वर्मा म्हणाले, “पुस्तके आणि गाेष्टी लहान मुलांना घडवण्यास, विकसित करण्यास अापल्याला मदत करतात. अापल्यासारखे अनेक तरुण किंवा अन्य लाेकांच्या या जुन्या क्लासिक पुस्तकांशी निगडित अनेक अाठवणी अाहेत.

‘द हॉबिट’च्या 4 आवृत्त्या देतील 35 लाखांपेक्षा जास्त रुपये
१९३७ मध्ये प्रसिद्ध जेआरआर टॉल्किनचे चिल्ड्रन फँटसी पुस्तक अाजही लाेकप्रिय अाहे. जाणून घ्या काेणते पुस्तक किती देईल ते.

पुस्तक वर्ष किंमत लाख
हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन १९९७ ९९.६७
विनी द पूह कलेक्शन १९२६ १७.८४
द कॅट इन द हॅट १९५७ १४
द हॉबिट-१ १९३७ १०.५१
द हॉबिट-२ १९३७ ९.४४
द हॉबिट- अमेरिका १९३८ १०.४८
द हॉबिट-३ १९५१ ५.२५

बातम्या आणखी आहेत...