आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Harvard University Professor On India Over Coronavirus (COVID 19) Vaccine Supply, Said That All The Vaccines That The World Has Received So Far Are Due To India

हार्वर्ड यूनिव्हर्सिटीकडून भारताला सॅल्यूट:अमेरिकन प्राध्यापक म्हणाले- जगाला आतापर्यंत जितक्या लस मिळाल्या, त्या सर्व भारतामुळेच

वॉशिंग्टन(हिमांशु मिश्रा)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक अत्याचारांनंतरही भारतातील लोकांनी जगाला मदत केली

भारत सध्या कोरोनाच्या घातक लाटेचा सामना करत आहे. दररोज 3.50 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत असून, 3 हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा दररो मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर आणि ऑषधांची कमतरता भासत आहे. अशा कठीण परिस्थितीत जेव्हा भारतातील लोकांचा विश्वास तुटत आहे, तेव्हा अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल आणि पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ. जेसी बम्पने भारताच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताचा गौरवशाली इतिहास संपूर्ण जगाला सांगितला. ते म्हणाले की, अनेक अत्याचार सहन करुनही भारत सर्व जगाला नेहमीच मदत करत आलाय.

लसीकरण मोहीम कशी राबवायची, हे भारताने संपूर्ण जगाला शिकविले प्रो. जेसी बम्प म्हणाले की, 'जागतिक स्तरावर आरोग्य सुविधा सुधारण्यामध्ये साउथ एशियन देश, विशेष भारताची महत्वाची भूमिका राहिली आहे. आम्ही सर्व हे मान्य करतो.

219 वर्षांपूर्वी संपूर्ण जगात चेचक (स्मॉलपॉक्स) पसरला होता. हा त्यावेळेस नवीन आजार होता आणि या आजारामुळे 3-5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. अशावेळी ब्रिटिश सरकारने भारतीय लोकांवर बळजबरीने चाचण्या केल्या होत्या. भलेही याचा फायदा संपूर्ण जगाला झाला, पण भारतीयांवर खूप अत्याचार झाले. सुरुवातीला असे अनेक उपक्रम भारतीयांवर राबविण्यात आले होते.'

आधी गाय, नंतर अनाथांवर करायचे ट्रायल

ब्रिटिश शास्त्रज्ञ सुरुवातील होणारे सर्व ट्रायल गाईंवर करायचे आणि नंतर भारतातील अनाथांवर करायचे. लसीकरणाचे ते अभियान वर्णद्वेषी आणि असंवेदनशील असायचे. भारतात वैरियलायझेशनचा इतिहास यापेक्षाही जुना आहे. यामुळेच भारतातूनच लस तयार करण्याचे योग्य तंत्रज्ञान जगाला मिळाले.

तुम्हाला लस मिळत असेल, तर भारताचे आभार माना
नॉलेज आणि वेस्टर्न सुप्रीमच्या नावावर भारतीयांवर अनेक आरोग्य गुन्हे झाले. येथूनच संपूर्ण जगाने लसीकरणाचे अभियान चालवणे आणि वितरीत करणे शिकले. यूनिसेफ आजदेखील भारतीय पॅटर्नवर काम करत आहे. म्हणूनच तुम्हाला आज लस मिळत असेल, तर त्यासाठी भारतीयांचे आभार माना.

भारतीयांवर शोध केल्यामुळे पाश्चिमात्य देशांचा फायदा झाला

भारतीयांवर शोध केल्यामुळे पाश्चिमात्य शाळेतील विद्यार्थी, रिसर्च एक्सपर्ट्स, एजुकेशनिस्ट यांना फायदा झाला. भारतामुळेच आज जगातील अनेक मोठ-मोठ्या संस्थांना फायदा होत आहे. भारतामुळेच अनेक शास्त्रज्ञांचे करिअर बनले.

भारतात आजदेखील मोठ्या प्रमाणात चाचण्या होतात

मोठ्या माहितींमागे अनेकांना खूप काही सहन करावे लागले. भलेही आता इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स (IPR) आल्यानंतर अशा चाचण्यांना कायदेशीर परवानगी मिळाली आहे. पण, हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा लोक स्वतः चाचण्यांसाठी परवानगी देतील. स्वतःचा जीव धोक्यात घालून लोक चाचण्यांसाठी परवानगी देतात. आजदेखील असे मोठे अभियान भारतात होते.

भारताने नेहमी साथ दिली, आपण काय दिले ?
प्रो. बम्प यांनी वेस्टर्न एकेडमिक्स आणि रिसर्च इंस्टीट्यूशंसचे 'हेल्थ फॉर ऑल'चा हवाला देताना भारताला मदत करण्याची अपील केली आहे. ते म्हणाले अनेक अत्याचार सहन करुनही भारताने आपल्याका खूप काही दिले, पण आपण भारताला काय दिले ?

बातम्या आणखी आहेत...