आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Has 'Voyager 1' Been Hijacked By Aliens?, NASA's Spacecraft Is Sending Strange Messages, Latest News And Update

'व्हॉयझर-1' एलियन्सनी हायजॅक केले आहे का?:NASA चे अंतराळ यान पाठवत आहे विचित्र संदेश, सूर्यमालेबाहेर करत आहे प्रवास

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

"अथांग ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवरच सजीवसृष्टी आहे काय?" या महत्वपूर्ण प्रश्नाची उकल करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था (नासा) गत अनेक दशकांपासून अथक प्रयत्न करत आहे. यासाठी नासाने अंतराळात अनेक अत्याधूनिक यंत्र व उपग्रह सोडलेत. यात 45 वर्षांपूर्वी पाठवलेल्या 'व्हॉयझर-1' या अंतराळ यानाचाही समावेश आहे. हे यान सध्या आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील अंतराळात प्रवास करत आहे. आतापर्यंत हे यान अचूक माहिती पाठवत होते. पण, गत काही दिवसांपासून ते अत्यंत विचित्र संदेश पाठवत आहे. यामुळे वैज्ञानिक हैरान झालेत.

नासाने नुकतेच सांगितले की, व्हॉयझर चांगले काम करत आहे. त्याचा अँटेनाही योग्य दिशेला आहे. पण, तो एका वेगळ्या प्रकारचा डेटा पाठवत आहे. हा डेटा त्याने आतापर्यंत पाठवलेल्या डेटाशी मेळ खात नाही. त्यामुळे त्याचे एलियन्सनी अपहरण केले आहे काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

'व्हॉयझर-1' पाठवत असलेला डेटा 'नासा'साठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, याच डेटापासून त्यांना यानाच्या अँटेनाची दिशा पृथ्वीच्या दिशेने असल्याचे समजते.

'व्हॉयझर-1' चा गूढ व्यवहार

'नासा'च्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीच्या प्रोजेक्ट मॅनेजर सुजैन डॉड म्हणाल्या की, 'व्हॉयझरने असा व्यवहार करणे अत्यंत गूढ गोष्ट आहे. या यानाची AACS यंत्रणा योग्य ती माहिती पाठवत नाही. ही यंत्रणा यानाच्या ठिकाणाची माहिती पाठवण्यासह विविध प्रकारची काम करते. त्यातील एक काम व्हॉयझरचा अँटेना पृथ्वीच्या दिशेने ठेवण्याचे आहे.' त्या पुढे म्हणाल्या -'AACS अजूनही आपले काम करत आहे. पण, तो एरर डेटा पाठवत आहे. ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.'

'व्हॉयझर'मध्ये यापूर्वीही दुरुस्ती

डॉड पुढे म्हणाल्या -'सध्या या कारणामुळे व्हॉयझरमध्ये कोणतीही समस्या दिसून येत नाही. अँटेना सातत्याने सिग्नल पाठवत आहे. म्हणजे तो सुरुळीतपणे काम करत आहे. त्याची दिशाही पृथ्वीच्या दिशेने आहे.' त्या म्हणाल्या -'इंजिनियर या समस्येवरील तोडगा सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, त्यात यश आले नाही तर पुढील पर्याय शोधावे लागतील.'

विशेष म्हणजे व्हॉयझरमध्ये बिघाड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2017 मध्ये त्याच्या थ्रस्टरमध्ये बिघाड झाला होता. त्यानंतर दुसरे एक थ्रस्टर तब्बल 37 वर्षांनी सुरू करण्यात आले होते.

एक संदेश येण्यासाठी लागतात 2 दिवस

'व्हॉयझर-1' 1977 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते. त्यानंतर 2012 मध्ये ते आपल्या सौर मंडळातून बाहेर पडले. सध्या ते इंटरस्टेलर अंतराळात प्रवास करत आहे. आपल्या सूर्यमालिकेबाहेर प्रवास करणारी ही मानवनिर्मित पहिलीच वस्तू आहे. सध्या व्हॉयझर पृथ्वीपासून सुमारे 23 अब्ज किलोमीटर दूर आहे. हे अंतर एवढे आहे की 'व्हॉयझर'ने पाठवलेला एक संदेश पृथ्वीपर्यंत येण्यासाठी व येथून त्याच्यापर्यंत संदेश पाठवण्यासाठी तब्बल 48 तासांचा अवधी लागतो.

बातम्या आणखी आहेत...