आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hashmat Ghani Said There Was A Plot To Kill Ashraf Ghani To Create Chaos, So That Some Of These Retired Old Warlords Can Play Their Cards; News And Live Updates

अशरफ घनींच्या भावाचा खुलासा:अफगाणिस्तानी राष्ट्रपतींचे देश सोडण्याचे सांगितले कारण; अरशफ घनी यांना मारण्याचा होता कट - हशमत घनी

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीत भारताची भूमिका काय दिसते?

तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवण्यापूर्वीच अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला होता. त्यानंतर तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. देशातील नागरिकांना वाऱ्यावर सोडत राष्ट्रपतींनी देश सोडल्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. परंतु, या सर्व परिस्थितीनंतर त्यांचा भाऊ हशमत घनी यांनी वेगळाच दावा केला आहे. राष्ट्रपती अशरफ घनी मारण्याचा कट रचला गेला होता. त्यामुळे ते देश सोडून गेले असा धक्कादायक खुलासा हशमत घनी यांनी केला आहे.

हशमत घनी हे अफगाणिस्तानचे प्रभावी नेते आणि व्यापारी आहेत. दरम्यान, त्यांनी तालिबानचे शासन स्वीकारले असून तालिबानमध्ये सामील झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे. मीडिया हाउस विआॅनला दिलेल्या मुलाखतीत हशमत यांनी राष्ट्रपती अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान का सोडले? याचे कारण सांगितले आहे. त्यामुळे या मुलाखतीमधील प्रश्न आणि उत्तरे वाचून समजून घ्या...

तुम्ही तालिबानला पाठिंबा दिला आहे, हे खरे आहे का?
हा एक गैरसमज आहे. मी त्यांचे शासन स्वीकारले आहे. परंतु, त्यांच्याशी हातमिळवणी केली नाही. तालिबान्यांकडून होणारे रक्तपात टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. मी माझ्या समुदायातील सुशिक्षित आणि व्यापार करणार्‍यांच्या सुरक्षेसाठी येथे राहिलो आहे. मी तालिबानमध्ये सामील होणार नाही. मी देशातच राहणार असून यामाध्यमातून तालिबान आणि सामान्य नागरिकांच्या मधातील दुवा म्हणून काम करू शकेन. देशात भूकबळी वाढू नये, आपला देश रसातळाला जाऊ नये म्हणून मी इथेच थांबणार असल्याचे ते म्हणाले.

अफगाणिस्तान आणि विशेषत: काबूलमधील परिस्थिती कशी आहे?
ते पुढे म्हणाले की, या लोकांनी सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम काम केले आहे. अफगाणिस्तानातील एकमेव समस्या म्हणजे तालिबान आणि अमेरिकन सैन्यामधील सहकार्याची आहे. मी या दोघांना एक ऑफर दिली असून त्यांनी यास सहमती दर्शवली आहे. आम्ही अशी एक व्यवस्था बनवत आहोत की, ज्यात कोणाचाही बळी जाणार नाही, कोणाचाही अपमान होत नाही आणि कोणीही हा देश दुःखाने सोडणार नाही. अफगाणिस्तानात बँकिंग क्षेत्र नसल्याने दैनंदिन वस्तूंच्या किंमतींचा दिवसेंदिवस वाढत आहेत. अमेरिकन मदत थांबली आहे.

अफगाणिस्तानच्या सद्य परिस्थितीत भारताची भूमिका काय दिसते?
भारत अफगाणिस्तानात सध्या पाकिस्तानची मजबूत भूमिका पाहत आहे आणि हे कोणी नाकारू शकणार नाहीत. मी तालिबानला स्पष्टपणे सांगितले आहे की, भारत, इराण, मध्य आशिया, रशिया सारख्या देशांशी आंतरराष्ट्रीय आणि व्यापारी संबंध अफगाण समुदायासाठी आणि व्यापारासाठी आवश्यक आहेत. विशेष म्हणजे आजघडीला अफगाणचे फळ आणि ड्रायफ्रुट्स हंगामासाठी खूप महत्वाचे आहे. काबुलमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे दूतावास असणे आवश्यक आहे.

अशरफ घनी यांना कोण मारणार होते?
अशरफ घनी यांच्या विरोधात षडयंत्र रचले गेले असून ते नक्कीच याबद्दल काहीतरी सांगतील. काही लोकांना राष्ट्रपतींना मारून देशात रक्तपात घडवायचा होता. परंतु, अशरफ घनी यांनी वेळप्रसंगी देश सोडत काबुलला रक्तपातातून वाचवले आहे. यूएईमधून बाहेर आल्यावर त्यांना मारण्याचा कोणी कट रचला होता. हे ते स्वत: सांगतील असे हशमत यांनी यावेळी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...