आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश घसरला:हसीना सरकारचा भ्रष्टाचार ठरतोय विकासात अडथळा

बांगलादेश23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दशकात बांगलादेशाने ७% विकास दर प्राप्त करून आणि प्रगतिशील सामाजिक धोरणे अंगिकारत एका मॉडेल देशाच्या रूपात स्थान बनवले आहे. २०२६ मध्ये तो यूएनच्या कमी विकसित देशांच्या श्रेणीत वर येऊ शकतो. बांगलादेश २०३१ पर्यंत उच्च मध्यम उत्पन्नाचा देश होण्याची अपेक्षा आहे. दरडोई २५०० डॉलर जीडीपी भारतापेक्षा जास्त आहे. मात्र, आता शेख हसीना यांच्या अवामी लीग सरकारमधील वाढता भ्रष्टाचार आणि अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रातील वाढत्या हस्तक्षेपामुळे सुधारणा लागू करणे कठीण होत आहे. अर्थव्यवस्था रुळावरून घसरण्याचा धोका आहे. प्रगती सुरू ठेवण्यासाठी आर्थिक सुधारणा गतीमान करण्याची गरज आहे. मात्र, राजकीय आणि पायाभूत कमकुवतपणा आशियातील या उभरता तारा पतनाच्या दिशेने जाण्याचा गंभीर इशारा करत आहे. जानेवारीमध्ये त्याला आयएमएफकडून ४.७ अब्ज डॉलरचे कर्ज घेण्यास भाग पडले. बांगलादेश कापड उद्योगावर खूप अवलंबून आहे. याची निर्यात ८५% आहे. मात्र, यात स्पर्धा वाढत आहे. औषध आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विकासात लालफितीचा कारभार, लाचखोरी, कर्ज घेण्यात अडचणी यासारख्या अडचणी येत आहेत. शेख हसीना यांचा देशाला एक पक्षीय सरकारमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रावर परिणाम करत आहे. रोजगार, परवाना आणि सरकारी कंत्राटांवर सत्ताधारी पक्ष अवामी लीगचा हस्तक्षेप आहे. उच्च राजकीय संपर्क आणि प्रभावी लोकच देशातील बँकातून कर्ज प्राप्त करू शकत आहेत.

बातम्या आणखी आहेत...